आपल्या जिल्ह्यातील शिर्डी,शिंगणापूर यासारख्या
जगभर नावाजलेल्या पर्यटनस्थालांतील पर्यटकांचा ओघ काही प्रमाणात का होईना
अगस्ती ऋषिंची तपोभूमी ,असलेल्या अकोल्याकडे वळविणे गरजेचे आहे .त्यासाठी
सुनियोजित प्रयत्न आणि इच इच्चाशाक्तीची अवश्यक्यता आहे .पर्यटन शेत्राचा
एकात्मिक विकास ,रस्ते ,दळणवळण यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध
करून देणे आणि स्थानिकांची मानसिकता बदलणे ,या त्रिसूत्रीचा अवलंब
केल्यास अकोले तालुक्याचाही पर्यटन हा नजीकच्या काळात उत्पन्नाचा मुख्य
आधार निश्चितपणे होऊ शकेल .
Tuesday, 19 February 2013
पान २-----मग येथील दुर्ग ,डोंगर माथे ,प्राचीन मदिरे आणि जोडीला असलेले
निसर्ग वैभव ....हे पाहायला मोठ्या संख्यने पर्यटक येथे येतात .मात्र ते
आपल्या गाड्यांमध्ये बसून येतात खाण्या-पिण्याचे पदार्थ प्याकिंग करून
आणतात अगदी गाड्यांमध्ये डीझेल -पेट्रोल भरून आणतात येतात ,फिरतात ,पाहतात
,आनंद घेतात आणि आल्या पावलांनी निघून जातात .येथे उरतो केवळ त्यांनी
टाकलेला कचरा .पर्यटनातून येथील अर्थकारणाला जर का गती दिली तरच त्यातून
स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल पर्यटन हा व्यवसाय म्हणून पुढे येईल मात्र
त्यसाठी दोन्ही स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे .शासनाने पायाभूत सुविधा
उभारल्या पाहिजेत आणि लोकांची मानसिकता देखील बदलली पाहिजे .सध्या
रस्त्यांची अवस्था कठीण असून राज्येकर्तेही या बाबीकडे तटस्थ भूमेकीतून
पाहतात यात सुधरणा होणे आवश्यक आहे .पर्यटन स्थळा विषयी पर्यटकांना फारशी
माहिती नसते भंडारदरा येथे आलेले पर्यटक फार फार तर रंधा धबधबा ,घाटघर
,अमृतेश्वर पाहतो आणि आली पाऊली मुबई,पुणे,नाशिकला परततो हरिश्चंद्रगडावर
आलेल्या पर्यटकाला उत्तरेकडील विश्राम गडाची माहिती नसते कल्सुबैल
येणार्यांना भंडारदरा माहित असते परंतु निळवंडे धरणाबाबत ते अनभिज्ञ असतात
अकोले परिसरातील अगस्ती आश्रम ,गंगाधरे श्वर ,सिद्धेश्वर या मंदिराची
माहिती नसते रंध व इतर धबधबे पाहणार्यांना आढळा नदीवरील,मुळा खोरयतील
धबधब्याची पुसटशी देखील कल्पना नसते रानवाटा (ट्रेक)माहित नसतात
पावसाळ्याच्या तोंडावर काजवे पाहायला येणार्यांना तासभर आधी आले असते तर
घाटन देवीचा रमणीय सूर्यास्थ पहायला मिळेल हे त्यांच्या गावीही नसते या
सर्व पर्यटन स्थळाची एकत्रितपणे माहिती झाली .तालुक्यतील एखाद्या ठिकाणी
निवास करून दोन तीन दिवसांमध्ये आपण हे सारे पाहू शकतो अशी व्यवस्था
निर्माण करून तसा विस्वास दिला तर पर्यटक येथे रेंगाळत राहतील मग लोणावळा
,महाबळेश्वर ,सारखे पर्यटन येथे वाढीला लागेल अर्थात मुलभूत सोयी सुविधा
उभारून केवळ भागणार नाही तर स्थानिकांची मानसिकता बदलणे तितकेच महत्वाचे व
गरजेचे आहे .पर्यटनाकडे त्यंनी उपजीविकेचेउत्पन्नाचे चांगले साधन म्हणून
पाहिले पाहिजे .सकारात्मक दृष्टीकोनातून विचार केला पाहिजे .स्वछ्य्ता
,सुरक्षितता,विनम्र सेवा आणि विश्वासार्हता या कोणत्याही पर्यटकांच्या चार
अपेक्षा असतात .कोकणात अनेक गावात तेथील घरातच मुक्कामाचीजेवणाची
सोय असते :"अतिथी देवो भवो "हि संस्कृती त्यांनी प्राणपणाने जपली आहे
.त्यामुळे कुटुंब कबिल्या सह घराबाहेर पडणारी माणसे मोठ्या प्रमाणावर
कोकणात फिरताना दिसतात हि संस्कृती अकोले तालुक्यात रुजवण्याची आवश्यकता
आहे.सध्या चलनी नाणे असलेल्या इको टुरिझम साठी येथील परिसर आदर्शवत असाच
आहे बोलणाऱ्याच्या करड्या विकतात परंतु गप्प बस्नार्यांच्या बक्षी गव्हाला
कोणी विचारत नाही. आजच्या मार्केतीन्गच्या जमान्यात या म्हणीला अधिकच
महत्व आले आहे .अर्थात काय विकायच हे विकणारयाला निश्चित जान आणि मान
पाहिजे .नेमकी तीच गोष्ट येथे दिसत नाही .त्यामुळे येथे दाखविण्यासारखे
,विक्रीमूल्य असलेल्या अनेक बाबी येथे असूनही तशी दृष्टी नसणे ,हेच मुख्य
अडचण आहे .
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment