Tuesday, 19 February 2013
राजूर (शांताराम काळे)अलीकडच्या काळात पर्यटन व्यवसायाला उद्योगाचे स्वरूप
आले आहे .काही देशाचे संपूर्ण अर्थकारण च पर्यटनावर अवलंबून असते आपल्याकडे
देखील गोव्यासारख्या राज्यासह अनेक शहराची अर्थव्यवस्था पर्यटन उद्योगावर
अवलंबून आहे पर्यटन सारख्या सेवा उद्योगाच्या माध्यमातून रोजगाराच्या
मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात मुळात या उद्योगाला मनुष्यबळ मोठ्या प्रमणात
लागते त्य्मुलेच त्यात स्वयंरोजगार संधी जास्त आहेंत .परदेशात जाऊन हॉटेल
व्यवस्थापनाची पदवी घेतलेल्या उच्च शिक्षित तरुण तरुणीपासून गावाकडे
रस्त्य्च्य कडेला उभे राहून जांभळे -करवंदे विकणाऱ्या निरक्षर खेडूतापर्यंत
येथे संधीची विपुलता,समानता आहे .त्यामुळेच पर्यटन वृद्धीसाठी ,विकासासाठी
आवश्यक असणारे पोटेंशियल निसर्गातच उपलब्ध असलेल्या अकोलेसारख्या
तालुक्यात मोठा वाव आहे आणि मुख्य म्हणजे पर्यटन संस्कृती म्हणून जे काय
असावे ते येथील मातीत रुजविण्याची गरज आहे. अकोले तालुक्याला अभिजात
निसर्ग सौंदर्य चे वरदान लाभले आहे .वेगवेगळ्या ऋतूत येथे निसर्गाचे
निरनिराळे विक्रम पाहायला मिळतात .शिखर स्वामिनी कळसुबाई तिलाच बिलगून
असलेली अलंग,कुलंग ,मदन ,या दुर्ग त्रिकुटाची अज्यास्र पर्वत रांग
.दक्षिणेला दुर्गराज ,रतनगड ,कात्राबाई,बहिरोबा ,पाबरगड यांची अभेद्य आणि
बलाढ्य असि डोंगररांग .या सगळ्या निसर्ग शिल्पाचे कोंदण लाभलेल्या परिसराचा
मधोमध विसावलेला भंडारदरा धरणाचा जलाशय .विश्राम गड ,बिवान्गड ,कुंजीर गड
,आणि निरनिराळ्या ऋतूत निसर्गाच्या सोहळ्याचे दर्शन भान हरपून पाहत राहावे
असा बेलाग दुर्ग हरिश्चंद्र गड आणि त्याचा तो मनमोहक परिसर .ते थिल उरात
धडकी भरविणारा आक्राळ -विक्राळ आणि तरीही सुंदरतेने नटलेला कोकणकडा म्हणजे
तर निसर्ग देवतेला पडलेले एक स्वप्न च जणू ! निसर्ग सौदर्यांनी नटलेल्या या
परिसरातील जैवविविधता देशतील आदर्श ठिकाणा पैकी एक समजली जाते .याशिवाय
गर्द वन राई च्या कुशीतून जाण्याऱ्या रान वाटा प्राचीनतम वास्तुवैभवाची
साक्ष देणारी अमृतेश्वर(रतनवाडी)हरिचन्द्रेश्
वर ,टाहकरी ,शिध्देश्वर
,गंगाधरेश्वर ,आम्लेश्वर (अम्भोल)हि मंदिरे ,घाटघर ,कोदनी ,भंडारदरा सारखे
जालविधुत प्रकल्प आधुनिक तीर्थ क्षेत्र म्हणून ओळखली जाणारे भंडारदरा
,निळवंडे यासारखी जल मंदिरे भन्नाट वाऱ्याच्या झोताबरोबर गरागरा फिरणारी
पवनचक्या ची पाती घाटन देवीच्या परिसरातील सूर्यास्त ......आणखी कितीतरी
.....पावसाळ्यातील येथील निसर्ग जेव्हा चिंब होतो .रान आबादानी होतं
,तेंव्हा येथील जलोत्सव पाहायला हौशी पर्यटकाची अक्षरश:झुंबड उडते या
जलोत्स्वपुर्वी येथे निसर्गाच्या एका अनोख्या अविष्काराचे दर्शन घडते ते
म्हणजे काजवा मोहत्सव पावसाळ्याच्या तोंडावर मे महिन्यात येथे अंधाराच्या
गडद काळ्या पार्श्वभूमीवर दिसणारी काजव्याची लुक लुक डोळ्याची पारणे फेडते .
वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग जणू काजव्याची प्रकाश फुले उधळीत
असल्याचा भास काजव्याचा महोत्सव पाहताना होतो . पान २ पाठवतो
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment