|
|
मराठी मुले-मुली इंग्रजी माध्यमाच्या शाळांत जातात
म्हणून वैषम्य वाटायचे कारण नाही. त्यांना चांगले इंग्रजी आलेच तर त्यांची
मराठीही सुधारेल. एक भाषा चांगल्या रीतीने शिकली तर दुसरी, तिसरी भाषा
शिकणे सोपे होते. परभाषेबद्दल प्रेम पाहिजे, जिज्ञासा पाहिजे.
मातृभाषेबद्दल वृथा अभिमान नको, आत्मीयता पाहिजे..! तकाळ असा होता की
महाराष्ट्रात दोन, तीन किंवा अधिक भाषा येणार्यांचे प्रमाण भरपूर होते.
एखादी भाषा येणे म्हणजे मार्केटमध्ये भाजीवाल्याशी त्याच्या भाषेत हुज्जत
घालणे नव्हे. मातृभाषा नसलेल्या भाषेतील अर्थच्छटा, वाक्य-रचना आणि
मागचा-पुढचा संदर्भ व्याकरणासहित येणे म्हणजे भाषा येणे. त्या भाषेत मत
व्यक्त करण्याइतपत शब्द-संपदा असणे आणि त्या भाषेतील वाड्मयकृतींचे वाचन
तसेच ती भाषा ज्यांची मातृभाषा त्यांच्याशी त्या भाषेतून संवाद साधता येणे,
असे त्या भाषेतील चढत्या प्राविण्याचे निकष असतात. भाषेचे अर्धवट ज्ञान
कसे हास्योत्पादक ठरते याचा नमुना म्हणून एका ब्रिटिश साहेबाने त्याच्या
मराठी भाषक सहकार्याला लिहिलेले पत्र दाखविता येईल. त्याने लिहिले होते :
''माझी पत्नी व्याली, तिला एक नरपिल्लू झाले.'' भाषांतर करताना झालेल्या
सर्वच गफलती अनवधानाने झालेल्या नसतात, त्या अज्ञानानेही झालेल्या असू
शकतात. दर्जा पातळ करण्याच्या आजच्या काळात काही शब्द शिकता आले तरी नवी
भाषा आपल्याला येऊ लागली, असा आपण ग्रह करून घेतो. 'दोन भाषांवर प्रभुत्व'
असल्याचे शिफारस-पत्र कोणालाही पटकन द्यायला आपण तयार असतो. बहुतेक
भाषांची आबाळ होत असताना आपल्याला दोन-तीन भाषांतील काही शब्द ज्ञात
असण्याच्या बळावर आपण त्या भाषेवर प्रभुत्व असल्याची समजूत करून घेणार असलो
तर काय म्हणायचे? वामन-पंडिताचीच साक्ष काढावी लागेल. ''जधी काही काही
'हरि, कवि' असे शब्द शिकलो! तधी मी सर्वज्ञ द्विप-सम मदे याच भरलो !! जधी
काही नेणे म्हणुनि वदले पंडित मला! तदा माझा गर्व-ज्वर सकळही हा उतरला!!''
अशीच अनेकांची अवस्था. काही दशकांपूर्वी प्रत्येक सुशिक्षिताला कमीत
कमी दोन भाषा चांगल्या यायच्या. घरी शिकलेली मातृभाषा मराठी आणि शाळेत
साहेबाने शिकवलेली इंग्रजी. अनेक अधिकचे म्हणून संस्कृत तर शिकायचेच, पण
जमल्यास आणखी एखादी भाषा शिकायचे. १९ व्या शतकात भाषा-पटुत्वाची,
भाषा-वृद्धीची चढाओढ लागली होती की काय कोण जाणे. सर्वांचे म्होरके होते
बाळशास्त्री जांभेकर. भाषा-उद्यानातील गुल-बकावलीचे फूल म्हणता येतील असे.
ते बहु-भाषा-पंडित होते. त्यांना ग्रीक आणि लॅटिन या अभिजात समजल्या
जाणार्या भाषाही येत असत. स्वातंत्र्य-पूर्व काळात महाराष्ट्रातील
सुशिक्षितांत द्वि-भाषिक तशीच त्रि-भाषिक मंडळी भरपूर होती. आता शिक्षणाचे
लोण तळा-गाळापर्यंत पोहोचले आहे, पोहोचत आहे, ही निश्चित स्वागतार्ह बाब
आहे. पण शिक्षणाच्या लोकशाहीकरणात भाषांचे बळी देणे क्रमप्राप्त होते का?
मातृभाषेला पर्याय नाही, ती आलीच पाहिजे, चांगली आली पाहिजे, यात वाद नाही.
इंग्रजी भाषा ही साहेबाने आपल्यावर लादलेली भाषा खरी; पण ती शिकल्यामुळे
आपले नुकसान न होता लाभच झाला आहे, हे आपण का विसरत आहोत? वैश्विक
ज्ञानाची कवाडे आपल्याला इंग्रजीमुळे खुली झाली आणि अखिल जगाशी आपला संवाद
सुरू झाला, हे निखळ सत्य आहे. इंग्रजी शिकल्यामुळे मराठी-भाषकांना
इंग्रजीतून अन्य भाषकांशी संवाद करणे सोपे गेले. अनेक मराठी पिढय़ांनी
मराठीतून लेखन केले, त्याप्रमाणे इंग्रजीतूनही लेखन केले, इंग्रजीतून
व्याख्याने दिली. त्यांना देशाने नेतृत्व दिले, त्यांचे मोठेपण
देशवासीयांच्या ध्यानात आले म्हणून. रानडे आणि टिळक केवळ मराठीत लिहीत वा
व्याख्याने देत राहिले असते तर त्यांना अमराठी लोकांचे नेतृत्व मिळाले असते
का? सर जदुनाथ सरकार यांनी इंग्रजीत इतिहास लिहिले. पण त्यांचे लेखन
बंगालीतही प्रसिद्ध झाले. इतिहासाचार्य राजवाडे यांना इंग्लिश येत नव्हते
असे नव्हे. तेही डेक्कन कॉलेजचे ग्रॅज्युएट होते. पण त्यांनी शपथ घेतली
होती इंग्लिशमधून न लिहिण्याची. सर जदुनाथ सरकारांचे लेखन जगभर प्रसिद्ध
झाले, इतिहासाचार्य राजवाड्यांचे लेखन मराठीपुरते र्मयादित राहिले. आज तर
त्यांचे लेखन इंग्रजीत अनुवादित करण्यासाठीही माणसे नाहीत या महाराष्ट्रात. भाषावार
प्रांतरचना झाली, मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा झाली आणि इंग्रजीची
आबाळ सुरू झाली. मराठीचीही आबाळ होत गेली. महाराष्ट्र-निर्मितीमुळे
अधिकृतपणे एकभाषिकता आली. मेहनत न करू पाहणार्यांच्या ती पथ्यावर पडली.
इंग्रजीमुळे आमची मराठी बिघडली आणि नंतर आमचे इंग्लिशही बिघडले, असा
कांगावा करायला सारे मोकळे झाले. इंग्रजीबद्दल तिरस्काराची भावना नव्या
पिढय़ात रुजवली गेली, तिने भाषा-व्यवहाराचाच महाराष्ट्रात बळी घेतला.
अ-मराठी लोकांशी चाललेला संवाद संपविला. परिणामी, महाराष्ट्राचे नेतृत्वही
गेले. पोकळ अभिमानाने सारा अनर्थ केला. भाषेच्या बाबतीत आपले 'तोडी नाक तबला अने फोडी नाक पेटी' झाले आहे. संस्कृत भाषेचा पाया आपण तोडून टब् कालान्तर
|
No comments:
Post a Comment