चंद्रावर आपण पाणी शोधतो आणि अजूनही गावांमध्ये पिण्याचे
स्वच्छ पाणी पोहचलेले नाही..शास्त्रज्ञांपुढे संशोधनातील ही नेमकी काय
आव्हाने आहेत, संशोधनाच्या दिशा चोखळताना नेमके काय घडतेय? सामान्य माणूस
'विज्ञान-संशोधना'च्या परिघात नेमका कुठे आहे? असे अनेक प्रश्न
आहेत..येत्या २८ फेब्रुवारी 'विज्ञानदिन'आहे आणि तो विद्यार्थी
शाळा-महाविद्यालये, संशोधनकेंद्रातून साजरा करतील. पण भविष्यात विज्ञानात
कोणती संशोधने होणे अपेक्षित आहेत, ज्यामुळे मुलभूत प्रश्न सुटतील,
विज्ञान-तंत्रज्ञान खर्या अर्थाने लोकाभिमुख होईल याबाबत खास
विज्ञानदिनानिमित्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी मांडलेले
विचार.! ज्ञानात 'एक्सलन्स' आणि 'रेलेव्हन्स' हे दोन महत्वाचे प्रकार आहेत.
एक्सलन्स म्हणजे गुणवत्ता. त्यात उत्कृष्ट संशोधन केले जाते. जगात या
स्वरुपाच्या संशोधनाला 'वर्ल्ड क्लास' संबोधून नोबेल पारितोषिक मिळते. अशा
संशोधनाला प्रतिष्ठेच्या नोबेलसोबतच 'फेलो ऑफ रॉयल सोसायटी' आदी जगप्रसिध्द
पुरस्कार दिले जातात. अशा पुरस्कारांनी त्या त्या देशाचे नाव उंचावते.
दुसरा प्रकार रेलेव्हन्स. या प्रकारात विज्ञानाचा उपयोग समाजाचा विकास
करण्यासाठी, मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी केला जातो. विज्ञान जगतात असे
म्हटले जाते की, एक्सलन्स आणि रेलेव्हन्स हे दोन्ही प्रकार कधीही एकत्रित
येऊ शकत नाहीत. पण ही समजूतच खोडण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी प्रयत्न
करायला हवेत. आपल्या संशोधकांनी 'एक्सलन्स आणि रेलेव्हन्स' या दोन्हींना
एकत्रित आणायला हवे. यातूनच भारताचा खरा विकास साधता येईल आणि जागतिक
संशोधनाबरोबरच आपल्या मुलभूत प्रश्नांनाही हात घालता येईल.
बहुतेकदा शास्त्रज्ञ संशोधन करताना ते जगप्रसिध्द जनरलमध्ये कसे प्रसिध्द होतील, याचा विचार करतो. पण आता शास्त्रज्ञांनी ही विचारधारा बाजूला ठेवण्याची आवश्यकता आहे. संशोधनाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी, त्यात बदल घडवून आणण्यासाठी कसा करता येईल, याची जाणीव प्रत्येक शास्त्रज्ञामध्ये निर्माण होणे गरजेचे झाले आहे. अनेक देश म्हणतात की, आपल्याला कशाला संशोधन हवे आहे, विकसीत देश विज्ञानात संशोधन करतील आणि त्यातून तंत्रज्ञान, नवकल्पना (इनोव्हेशन) निर्माण होतील. ते संशोधन नंतर विकत घेऊन आपल्याला वापरता येईल. त्यासाठी वेगळा खर्च कशाला करायचा. त्याचपद्धतीचा विचार आपल्याही देशात केला जातो. मात्र काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम फक्त भारतीय शास्त्रज्ञच करू शकतात. मलेरिया व इतर काही गंभीर आजारांची उदाहरणे यासाठी देता येतील. याप्रकारच्या आजारांचा प्रादरुभाव आपल्या देशात जास्त आहे. अशा गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. नागरिकांना फायदा होईल असे तंत्रज्ञान हवे इनोव्हेशन..एक्सक्लूझीव इनोव्हेशन.. याचा फायदा केवळ o्रीमंतांनाच होतो. आयपॅड, आयफोन ही त्याची उदाहरणे. त्यांचा फायदा सामान्यांना होतो का? तर त्याचे उत्तर नाही हेच आहे. शास्त्रज्ञांनी असे तंत्रज्ञान विकसीत केले पाहिजे, ज्याचा फायदा सामान्य नागरिकांना होईल. याचे एक महत्वाचे उदहारण देता येईल, काही वर्षापूर्वी लॅपटॉप हा २ हजार डॉलरला मिळायचा. त्यामुळे तो एका विशिष्ट वर्गासाठीच र्मयादित होता. तो २00 डॉलरमध्ये मिळेल का, असे आव्हान 'न्यू मिलेनियम इंडियन टेक्नॉलॉजी लिडरशीप इनोव्हेशन' या योजनेच्या माध्यमातून आम्ही केले होते. तेव्हा त्यातून प्रेरणा घेऊन विनय देशपांडे यांनी २00 डॉलरमध्ये लॅपटॉप बनविला आणि तो बाजारात आला. त्यातून प्रेरणा घेवून 'आकाश' हा टॅबलेट बनविता आला. ज्याची किंमत अवघी ३५ डॉलर आहे. या अविश्वसनीय संशोधनामुळे आता स्वप्न मांडता येईल की, प्रत्येक शाळकरी मुलाकडे टॅब असेल आणि तो वहया-पुस्तकांचे ओझे वाहणार नाही. त्याला ते सगळे, इंटरनेट एक्सेस टॅबवर मिळेल. त्यामुळे तो संपूूर्ण जगाशी, जागतिक ज्ञानाशी जोडला जाईल. प्रत्येक मुलाला टॅब मिळाला तर शिक्षणात एक मोठी क्रांती होईल. २ हजार डॉलरचा लॅपटॉप २00 डॉलरमध्ये आणणे जगातील कोणत्याही शास्त्रज्ञाला शक्य वाटले नव्हते. पण ते भारताने करून दाखविले. नागरिकांना फायदा होईल, त्यांच्या रोजच्या जगण्यात त्याचा वापर होईल असेच संशोधन होणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाने o्रीमंत-गरीबांमधील दरी वाढते जगाकडे पाहिले तर तंत्रज्ञानाचा झालेला विकास आणि त्याच्या वाढलेल्या वापरामुळे o्रीमंत आणि गरीबांमधील दरी वाढत जाते. ही दरी कमी करायची असेल तर वेगळे मार्ग शोधायला हवेत. त्यासाठी संशोधन करीत असताना कंपन्या 'मोअर द्यान मोअर' असे म्हणतात. म्हणजेच, जास्त पैसे द्या तुम्हाला जास्त विकसीत तंत्रज्ञान देतो, असे कंपन्या ग्राहकांना सांगतात. तर दुसरीकडे गरीबांसाठी 'लेस द्यान लेस' हे तंत्र कंपन्या अवलंबितात. याचे उदाहरण द्यायचे झाले तर, रस्त्यावरची वाहतूक पाहिली तर असे दिसून येते की o्रीमंत व्यक्ती र्मसिडिझसारख्या महागडया गाडया वापरतात तर गरीब व्यक्ती सायकल, स्कूटर वापरतात. असे बोलणेही आता रूढ झाले आहे. पण हे चित्र बदलण्याचे टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी ठरविले आणि त्यांनी ते बदलले सुध्दा. गरीबांना स्कूटरच्या किंमतीत चारचाकी गाडी देता येईल ज्यामध्ये सोयी-सुविधा, सुरक्षितता यात कोणतीही तडजोड केलेली नसेल, असे स्वप्न त्यांनी पाहिले आणि ते 'नॅनो'च्या माध्यमातून प्रत्यक्षातही उतरविले. हा एक मोठा बदल आहे. जगभर 'मोअर ा पान ८ वर |
Sunday, 24 February 2013
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment