काय आजची तरुण पोरं-पोरी. कसली मराठी बोलतात..
व्याकरणाचा तपास नाही.. मराठीतून इंग्रजी बोलतात की इंग्रजीतून मराठी हेच कळत नाही.. त्यामुळे मग मराठी वाचावासाठी आरडाओरडा करुन किंवा प्रसंगी आडमुठेपणा करत मराठीवरची अतिक्रमणं थांबवा म्हणणारी ही पुष्कळशी लोकं आपल्या आजुबाजूला आहेत.. पण असं नुसतं भोकाडं पसरून चालणार आहे का? तर मुळीच नाही.. मग काय करायचं तर, मराठीची गोडी लावायची पण जरा हुशारीने. मग पाहू मराठीचं नाणं कसं खणाणतं नाही..!! मराठी आणि महाविद्यालयीन तरुण 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..' छान वाटते नाही हे ऐकायला? ऐकताना उचंबळून वगैरे येते, नाही का? पण मला सांगा कोणत्याही कॉलेजात गेलात आणि दहा मुलामुलींना विचारले, 'खरेच असे वाटते का तुला? नुसते मराठी बोलणे किंवा ऐकणे हेच मोठे भाग्य वाटते का? धन्य वाटते का तुला?' माझा अंदाज आहे, जर ती मुले-मुली अगदी खरे बोलणारी असतील तर दहापैकी आठ जण म्हणतील, 'त्यात भाग्य किंवा धन्य वगैरे काय नाय वाटत. इट्स नॉट बॅड, पण चलता है..नो प्रॉब्लेम्स, यार !' या मुलांना मराठीबद्दल रागद्वेष वगैरे मुळीच नाही, पण नुसते चार मराठी शब्द ऐकू येण्यात किंवा बोलण्यात आयुष्याची इतिश्री किंवा महद्भाग्य वगैरे नाही वाटत. 'अरे यार आज इको को बंक मारा बरं का मैने,' असं म्हणण्याऐवजी 'मी आज अर्थशास्त्राच्या तासाला बसलो नाही बरे का,' असे म्हणण्याने काही यांच्या अंगावर रोमांच वगैरे नाही उभे राहात. कारण या 'उपयुक्ततावादी' संस्कृतीत मराठी त्यांना तसे आणि तितके मौलिक काही देऊ करत नाहीये. देऊ शकत नाहीये. त्यापेक्षा अगदी चाचपडत 'इंग्लिश विंग्लिश' शिकता येणो, बोलता येणो हे एखाद्या मध्यमवयीन बाईला देखील 'लाभले आम्हास भाग्य..' असेच वाटते. याचे मूळ कारण आपल्या दांभिक स्वभावात आहे. थोर माणसांचे पुतळे उभारून टाकणे, १५ ऑगस्टला मनोजकुमारच्या सिनेमातली गाणी लावणे आणि मातृभाषेबद्दल 'अमृतातेही पैजा जिंके' किंवा 'लाभले आम्हास.' छापाची गोड गोड गाणी रिंगटोनवर टाकणो ही त्या दांभिकतेची सार्वत्रिक रूपे आहेत. आरशासमोर कपडे काढायचे तर आपल्याला विलक्षण तिटकारा आहे. उलट नवनवे कपडे आणि दागिने घालून आपण आरशात बघतो. पुतळे, गाणी आणि हे सगळे उद्योग असे आपल्या स्वत:ला झाकणार्या दागिन्यांसारखे असतात. आपले खरे रूप आपण लपवत राहतो. मराठीतून अर्थशास्त्र आणि अकाउंटिंग शिकून पुढे मला नोकरी मिळण्यात काहीही फायदा होणार नाहीये हे आपण एकदाचं कबूल करून टाकावं की नाही? पण आपण ते कधीच नाही करणार. खरे तर चांगला पगार देणार्या कोणत्याच मोठय़ा कंपनीत असं मराठीत तेरजा आणि ताळेबंद नाही कुणी मांडत. डेबिट आणि क्रेडिटला कुणी 'जमा' आणि 'नावे' वगैरे नाही म्हणत . पण हे कबूल करून टाकत नाही आपण. ते अभ्यासक्रम चालू ठेवतो आपण. हा काही मातृभाषेविषयी आदर दाखवायचा सर्वोत्तम मार्ग नव्हे. ही आपली फसवणुक आहे. सात आठ छोट्या- मोठय़ा कंपन्यात काम करताना मी शेकडो इंटरव्ह्यू घेतले. अगदी ज्युनियर कारकुनाच्या जागेपासून पार सिनीयर मॅनेजरच्या पदापर्यंत सर्वांचे इंटरव्ह्यू घेतले. मराठी माध्यमातून बी. कॉम. केलेल्या कुणाला कधी इंटरव्ह्यूला देखील बोलावल्याचे मला स्मरत नाही. मात्र त्याचबरोबर हेही लक्षात घ्या, की कॉल सेंटरसाठी इंटरव्ह्यू घेताना चांगलं मराठी यायलाच हवं ही माझी मुख्य अट असे, हेही तितकंच खरं. सांगायचा मुद्दा म्हणजे आदर्शवादाने कितीही नाकारली किंवा धिक्कारणी केली तरी उपयुक्ततावादी संस्कृती टाळून पुढे जाणे अवघडच आहे आता. यासंदर्भात मराठी भाषेची हुशार (= स्मार्ट) 'प्लेसमेंट' करणे आवश्यक आहे. नुसते खोटे खोटे 'लाभले आम्हास भाग्य..' म्हणून फायदा नाही. त्यापेक्षा हुशारीने आणि व्यावहारिक शहाणपणाने मराठीची गुणवत्ता ओळखून तिची 'वादातीत उपयुक्तता' पटवून द्यायला हवी तरुण पिढीला. काय आहे ही वादातीत उपयुक्तता ? आणि कशी पटवून द्यायची ती? याबाबत काही महत्वाचे मुद्दे मांडतो. मराठीची वादातीत उपयुक्तता १. आपल्या भावनांची सर्वोत्कृष्ट आणि उत्स्फुर्त अभिव्यक्ती मातृभाषेतूनच होत असते. त्यामुळे उत्कट आनंद आणि दु:खाच्या प्रसंगी आपल्या मनाचे विरेचन मातृभाषेतून केल्याने अधिक समाधान लाभते. तो क्षण सर्वर्थाने साजरा होतो. २. मोठय़ा कंपन्या ग्राहकांशी संपर्क साधताना ग्राहकाच्या मातृभाषेतच संपर्क साधून आपले देशीपण अट्टाहासाने सिद्ध करतात. त्यातून त्या प्रतिस्पध्र्यापासून आपले वेगळेपण आणि जास्तीचे ग्राहकप्रेम सिद्ध करत असतात, त्यामुळे त्या क्षेत्रात उत्तम मराठीचे ज्ञान अत्यावश्यक मानले जाते. ही संधी मानली पाहिजे. ३.लिखित कलाकृतीचा आस्वाद घेताना वाचन अणि आकलन अशा दोन अवस्था असतात, त्यात भाषांतराची तिसरी अवस्था आपल्या मेंदूत नेणीवेत घडते तेव्हा अधिक श्रम पडतात आणि आशयघटकांचा र्हास होतो. याचे कारण म्हणजे सर्व मुख्य संकल्पना मुळातून आपण मातृभाषेतून समजून घेतलेल्या असतात. ४. नोकरी मिळणे आणि टिकवणे हे आयुष्याचे अंतिम ध्येय मानले तर जगणे हा एक कंटाळवाणा उपचार होतो. याउलट आस्वाद आणि अभिव्यक्ती हे जगणे सुंदर करायचे अवश्यक पैलू मानले तर दोन्ही बाबतीत मातृभाषेमध्य रेखाचित्र : प्रकाश सपकाळे |
Sunday, 24 February 2013
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment