Wednesday, 27 February 2013


To:
"शरदाचं चांदण, वसंताचा बहर, श्रावणाची पालवी या सर्वाहुन अधिक मनमोहक आकर्षक कोण? निरपेक्षपणे मैत्री हेच शब्द कानावर येतील."
मैत्री
म्हणजे एक रोपट असतं जे जमीनीत पुर्णपणे रुजलेल असतं वर दिसत त्याच्या
दुप्पत जमीनीत असतं ज्याचा गाभा शोधन केवळ अशक्य असतं. "पाणी रे पाणी तेरा
रंग कौसा" हे कधि कुणी सांगू शकेल का? तसचं मैत्रीच आहे. ति कशी असते, कधि
होते कुणासोबत व का होते? हे कुणालाच कधिच कळत नाही. पण जेव्हा मैत्री होते
तेव्हा मात्र आपण वेगळेच कुणीतरी होऊन स्वच्छंदी पाखराप्रमाणे आकाशात
तरंगत असतो.
मैत्रीमध्ये रंगीत धुंदी असते. यामध्ये वय, वेळ, समाज कशाचच बंधन रहात नाही.
मैत्री असते स्वच्छ निर्मळ पाण्यासारखी
पौर्णिमेच्या लख्ख चंद्रासारखी
त्या इवल्याशा पणतीच्या इवल्या वातीसारखी
कृष्णाच्या प्राणप्रिय राधेसारखी
व वनवासातही सोबत करणाय्रा सितेसारखी.
मैत्रीतही
अनेक प्रकार असतात, जसे काहीतरी हेतू ठेवून केलेली मैत्री, समोर आहे
म्हणून झालेली मैत्री आणि भावनिकरीत्या आपणहून नकळत झालेली मैत्री. नकळत
झालेली मैत्री असते तिच खरी मैत्री होय. खरचं आपण आई-वडिलांशी जितकं समरस
होऊन बोलू शकत नाही तितकं आपल्या मित्रांशी बोलतो. मग ही एक अद्वितीय शक्ती
मानायला काहीच हरकत नाही.
मित्र म्हणजे कोण असतं असं म्हणण्यापेक्षा
मित्र कोण नसतो हे विचारायला पाहिजे. मित्र म्हणजे आई, बहिण, पत्नी, शेजारी
व शत्रुही असतो कारण एक सच्चा मित्र या सगळ्या भुमीका पार पाडतो. तुम्ही
म्हणाल की मित्र शत्रु कसा असू शकतो, तर आपला मित्र चुकत असेल तर खरा मित्र
प्रसंगी त्याचा विरोध करुन परिणामी शत्रु बनुन आपल्या मित्राच्या हिताचे
रक्षण करतो. मित्र म्हणजे जणू एक परीस असतो जो आपल्या स्पर्शाने मित्रामधले
दोष बाजुला सारून त्याच्यात स्वत:च्या गुणांची भर घालतो व मित्राचं जिवण
उजळून काढतो. जो आपल्या मित्राच्या वाटेतले काटे वेचून त्याच्या वाटेत
फ़ुलांच्या पायघड्या तयार करतो. व त्याच्या पायातले काटे स्वत:च्या हातांनी
बाजुला काढतो. तोच खरा दिलदार मित्र होय.
मैत्रीत कशाचही बंधन नसतं ति
एक मुक्त मोरणीप्रमाणे आपल्या मोराला (मित्राला) साद घालत असते. मग तो
मित्र मुलागा, मुलगी, आई, आई, प्राणी, पक्षी कुणीही असू शकतं मैत्रीमध्ये
फ़क्त भावना महत्त्वाच्या असतात. मैत्री संगतीत जितकी फ़ुलते बहरते तितकीच
ति विरहात तिव्रतेने जाणवते तिचं महत्त्व कळतं आणि तिची आवश्यकता जाणवू
लागते.
मैत्री स्वच्छ आहे तितकीच ति स्वतंत्र आहे. ज्यावेळी हा/ही माझा
मित्र आहे हे सांगताना आपली जीभ थरथरत नाही किंवा आपण अडखळत नाही, जेव्हा
तुम्ही तुमच्या मित्राची ओळख छातीठोकपणे करुन देऊ शकता तेव्हा तुमची निखळ व
सच्ची मैत्री आहे असं मानायला कुठल्याही पुराव्याची किंवा वारश्याची गरज
तुम्हाला भासणार नाही.
प्रत्येक नात्याला एक संकल्पना एक विशिष्ट साचा
असतो. तसा मैत्रीला नसतो मैत्रीची व्याप्तीच एवढी मोठी आहे की तिला तोलनं
किंवा मोजण शक्यच नाही. प्रत्येक नात्यला रक्ताची ओळख सांगावी लागते म्हणजे
समजा भावाचं नात सांगण्यासाठी वडिलांच नाव पण मैत्री हे जगातल एकमेव असं
नात आहे ज्याला आणि रक्ताची ओळख सांगावी लागते पण मैत्री हे जगातल एकमेव अस
नात आहे ज्याला रक्ताची काहीच गरजा नाही व हे नात कुणाकडून उधार घेता येत
नाही व वारसाहक्कानेही मिळत नाही त्यामुळे ते निप:क्ष, स्वच्छ
जलाशयाप्रमाणे चकाकत राहतं.
मैत्रीचा उगम कोठून व कोणापासून झाला असेल
हे एक कधिही न उलगडणारे कोडे आहे. कितीही शास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, तज्ञ
एकत्र येऊन रिसर्च सुरु केला तरी या प्रश्नाचं उत्तर सापडणं या जन्मात तरी
शक्य नाही. पण तरीही यातील भावना, याचा उद्देश व याचं स्वरुप व प्रकटीकरण
पाहण आवश्यक आहे.
मैत्री एक हळुवार कोमल संवेदना आहे. याला शब्दात बांधण
कठीण आहे व बांधण्याचा प्रत्यत्न केला तर गुलाबाच्या पाकळ्याप्रमाणे ते
हातातून निसटतं व दूर जाऊन मनमोहक हसू लागतं. खरचं ज्या नात्याला उगम नाही
ज्याचा जन्मच नाही ते नात इतक दढ का होतं? अशी कोणती शक्ती आहे जिच्यामुळे
या नात्याची गुंफ़ण घट्ट गुंफ़ली गेलीय. मैत्रीत एकटेपणा घालवण्याची, आनंदी
ठेवण्याची क्षमता खुपच संस्मरणीय वाटते. आपल्या मित्रापासून दूर
गेल्यानंतर आपण आपल्या मित्राला सतत आठवतो त्याची उणिव क्षणाक्षणाला
जाणवायला लागते तेव्हा आपल्याला आपोआप आपल्या मैत्रीतली दृढता समजते व
जेव्हा ती समजते तेव्हा आपण खय्रा अर्थाने मित्र म्हणून मिरवण्यास पात्र
ठरतो.
रुपेरी वाळूमध्ये स्वच्छ कोजागीरीच्या आनंददायी रात्री जे प्रसन्न
मोहक वातावरण असतं तसा अनुभव मित्राला मित्राच्या मैत्रीमध्ये जाणवतो. ते
मित्र नेहमीच एकमेकांच्या सहवासात राहण्यास अतुरतात व जोशात येऊन धुंद होऊन
जनमताची, जात-पात, धर्म यांची पर्वा न करता बेफ़ामपणे मैत्रीच्या सुरात
गात सुटतात, "ये दोस्ती हम नही तोडेंगे" पण खर तर दोस्ती तुटायची नाही हे
म्हणताना ते विसरतात की तुटते ती मैत्री नसतेच शेवटी मैत्री म्हणजे अखंडता,
अतुटता यांचा बंध आहे.
"मैत्री म्हणजे नावं असतं, स्वत:मध्ये गजबजलेल गाव असतं.
मैत्री म्हणजे सदृढ स्वच्छ काया, जि मित्रावर करते आईप्रमाणे माया
मैत्री म्हणजे असते एक जागा, गुंतला जाते मित्राचा त्यामध्ये धागा"

To:
"शरदाचं चांदण, वसंताचा बहर, श्रावणाची पालवी या सर्वाहुन अधिक मनमोहक आकर्षक कोण? निरपेक्षपणे मैत्री हेच शब्द कानावर येतील."
मैत्री
म्हणजे एक रोपट असतं जे जमीनीत पुर्णपणे रुजलेल असतं वर दिसत त्याच्या
दुप्पत जमीनीत असतं ज्याचा गाभा शोधन केवळ अशक्य असतं. "पाणी रे पाणी तेरा
रंग कौसा" हे कधि कुणी सांगू शकेल का? तसचं मैत्रीच आहे. ति कशी असते, कधि
होते कुणासोबत व का होते? हे कुणालाच कधिच कळत नाही. पण जेव्हा मैत्री होते
तेव्हा मात्र आपण वेगळेच कुणीतरी होऊन स्वच्छंदी पाखराप्रमाणे आकाशात
तरंगत असतो.
मैत्रीमध्ये रंगीत धुंदी असते. यामध्ये वय, वेळ, समाज कशाचच बंधन रहात नाही.
मैत्री असते स्वच्छ निर्मळ पाण्यासारखी
पौर्णिमेच्या लख्ख चंद्रासारखी
त्या इवल्याशा पणतीच्या इवल्या वातीसारखी
कृष्णाच्या प्राणप्रिय राधेसारखी
व वनवासातही सोबत करणाय्रा सितेसारखी.
मैत्रीतही
अनेक प्रकार असतात, जसे काहीतरी हेतू ठेवून केलेली मैत्री, समोर आहे
म्हणून झालेली मैत्री आणि भावनिकरीत्या आपणहून नकळत झालेली मैत्री. नकळत
झालेली मैत्री असते तिच खरी मैत्री होय. खरचं आपण आई-वडिलांशी जितकं समरस
होऊन बोलू शकत नाही तितकं आपल्या मित्रांशी बोलतो. मग ही एक अद्वितीय शक्ती
मानायला काहीच हरकत नाही.
मित्र म्हणजे कोण असतं असं म्हणण्यापेक्षा
मित्र कोण नसतो हे विचारायला पाहिजे. मित्र म्हणजे आई, बहिण, पत्नी, शेजारी
व शत्रुही असतो कारण एक सच्चा मित्र या सगळ्या भुमीका पार पाडतो. तुम्ही
म्हणाल की मित्र शत्रु कसा असू शकतो, तर आपला मित्र चुकत असेल तर खरा मित्र
प्रसंगी त्याचा विरोध करुन परिणामी शत्रु बनुन आपल्या मित्राच्या हिताचे
रक्षण करतो. मित्र म्हणजे जणू एक परीस असतो जो आपल्या स्पर्शाने मित्रामधले
दोष बाजुला सारून त्याच्यात स्वत:च्या गुणांची भर घालतो व मित्राचं जिवण
उजळून काढतो. जो आपल्या मित्राच्या वाटेतले काटे वेचून त्याच्या वाटेत
फ़ुलांच्या पायघड्या तयार करतो. व त्याच्या पायातले काटे स्वत:च्या हातांनी
बाजुला काढतो. तोच खरा दिलदार मित्र होय.
मैत्रीत कशाचही बंधन नसतं ति
एक मुक्त मोरणीप्रमाणे आपल्या मोराला (मित्राला) साद घालत असते. मग तो
मित्र मुलागा, मुलगी, आई, आई, प्राणी, पक्षी कुणीही असू शकतं मैत्रीमध्ये
फ़क्त भावना महत्त्वाच्या असतात. मैत्री संगतीत जितकी फ़ुलते बहरते तितकीच
ति विरहात तिव्रतेने जाणवते तिचं महत्त्व कळतं आणि तिची आवश्यकता जाणवू
लागते.
मैत्री स्वच्छ आहे तितकीच ति स्वतंत्र आहे. ज्यावेळी हा/ही माझा
मित्र आहे हे सांगताना आपली जीभ थरथरत नाही किंवा आपण अडखळत नाही, जेव्हा
तुम्ही तुमच्या मित्राची ओळख छातीठोकपणे करुन देऊ शकता तेव्हा तुमची निखळ व
सच्ची मैत्री आहे असं मानायला कुठल्याही पुराव्याची किंवा वारश्याची गरज
तुम्हाला भासणार नाही.
प्रत्येक नात्याला एक संकल्पना एक विशिष्ट साचा
असतो. तसा मैत्रीला नसतो मैत्रीची व्याप्तीच एवढी मोठी आहे की तिला तोलनं
किंवा मोजण शक्यच नाही. प्रत्येक नात्यला रक्ताची ओळख सांगावी लागते म्हणजे
समजा भावाचं नात सांगण्यासाठी वडिलांच नाव पण मैत्री हे जगातल एकमेव असं
नात आहे ज्याला आणि रक्ताची ओळख सांगावी लागते पण मैत्री हे जगातल एकमेव अस
नात आहे ज्याला रक्ताची काहीच गरजा नाही व हे नात कुणाकडून उधार घेता येत
नाही व वारसाहक्कानेही मिळत नाही त्यामुळे ते निप:क्ष, स्वच्छ
जलाशयाप्रमाणे चकाकत राहतं.
मैत्रीचा उगम कोठून व कोणापासून झाला असेल
हे एक कधिही न उलगडणारे कोडे आहे. कितीही शास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, तज्ञ
एकत्र येऊन रिसर्च सुरु केला तरी या प्रश्नाचं उत्तर सापडणं या जन्मात तरी
शक्य नाही. पण तरीही यातील भावना, याचा उद्देश व याचं स्वरुप व प्रकटीकरण
पाहण आवश्यक आहे.
मैत्री एक हळुवार कोमल संवेदना आहे. याला शब्दात बांधण
कठीण आहे व बांधण्याचा प्रत्यत्न केला तर गुलाबाच्या पाकळ्याप्रमाणे ते
हातातून निसटतं व दूर जाऊन मनमोहक हसू लागतं. खरचं ज्या नात्याला उगम नाही
ज्याचा जन्मच नाही ते नात इतक दढ का होतं? अशी कोणती शक्ती आहे जिच्यामुळे
या नात्याची गुंफ़ण घट्ट गुंफ़ली गेलीय. मैत्रीत एकटेपणा घालवण्याची, आनंदी
ठेवण्याची क्षमता खुपच संस्मरणीय वाटते. आपल्या मित्रापासून दूर
गेल्यानंतर आपण आपल्या मित्राला सतत आठवतो त्याची उणिव क्षणाक्षणाला
जाणवायला लागते तेव्हा आपल्याला आपोआप आपल्या मैत्रीतली दृढता समजते व
जेव्हा ती समजते तेव्हा आपण खय्रा अर्थाने मित्र म्हणून मिरवण्यास पात्र
ठरतो.
रुपेरी वाळूमध्ये स्वच्छ कोजागीरीच्या आनंददायी रात्री जे प्रसन्न
मोहक वातावरण असतं तसा अनुभव मित्राला मित्राच्या मैत्रीमध्ये जाणवतो. ते
मित्र नेहमीच एकमेकांच्या सहवासात राहण्यास अतुरतात व जोशात येऊन धुंद होऊन
जनमताची, जात-पात, धर्म यांची पर्वा न करता बेफ़ामपणे मैत्रीच्या सुरात
गात सुटतात, "ये दोस्ती हम नही तोडेंगे" पण खर तर दोस्ती तुटायची नाही हे
म्हणताना ते विसरतात की तुटते ती मैत्री नसतेच शेवटी मैत्री म्हणजे अखंडता,
अतुटता यांचा बंध आहे.
"मैत्री म्हणजे नावं असतं, स्वत:मध्ये गजबजलेल गाव असतं.
मैत्री म्हणजे सदृढ स्वच्छ काया, जि मित्रावर करते आईप्रमाणे माया
मैत्री म्हणजे असते एक जागा, गुंतला जाते मित्राचा त्यामध्ये धागा"
शिक्षणेतर कामे, प्रशिक्षणाच्या माऱ्यामुळे शिक्षकच शाळाबा
खिचडी शिजवणे, भाकऱ्या थापणे, गावातील लोकांची मोजणी करणे, मतदान केंद्राची व्यवस्था पाहणे या शिक्षकांच्या कामांत आता आणखी एका कामाची भर राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे पडली आहे. त्यांच्यावर गावातील पाणवठे शोधण्याचे काम सोपविण्यात आले आहे! दुष्काळग्रस्त गावातील पाणवठे शोधून गावाचा पाण्याचा साठा किती दिवस पुरेल हे शोधण्याचे कामही शिक्षकांना करावे लागत आहे!! या कामासाठी त्यांना तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे!!! शिक्षणेतर कामे आणि प्रशिक्षणाचा मारा यामुळे शिक्षकांचा वावर आता शाळेपेक्षा शाळेबाहेरच जास्त होत आहे.
सर्व शिक्षा अभियान, इंग्रजी संभाषण, सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापन, बालस्नेही अभ्यासपद्धती आदी विषयांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माऱ्यामुळे खेडय़ापाडय़ांसह शहरांमधील शिक्षकांवरच शाळाबाह्य होण्याची वेळ आली आहे. हे कमी म्हणून की काय, आता त्यात प्रशिक्षणांचे 'टायमिंग' चुकल्याने ऐन परीक्षेच्या तोंडावर अभ्यासक्रम पूर्ण करायचा की शाळाबाह्य व्हायचे, या कात्रीत शिक्षक सापडले आहेत. या सर्व प्रकारात विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा मात्र खेळखंडोबा होत आहे.
कायद्यानुसार पहिली ते पाचवीच्या अध्ययनासाठी वर्षांचे किमान २०० दिवस (८०० तासिका) शिक्षकांनी वर्गात हजेरी लावायला हवी, तर सहावी ते आठवीसाठी किमान २२० दिवस (१००० तासिका). पण प्रशिक्षणांमुळे हे किमान तास भरणे शिक्षकांना शक्य होत नाही. त्यामुळे गेल्या वर्षी शालेय शिक्षण विभागाने जशी विद्यार्थ्यांची पटपडताळणी घेतली तशी शिक्षकांचीही घेतली तर राज्यातील किमान ५० ते ६० टक्के शिक्षक या ना त्या प्रशिक्षणामुळे वर्गावर गैरहजर असलेले आढळून येईल. अभ्यासक्रम परीक्षेच्या आधी कसाबसा पूर्ण व्हावा या प्रयत्नांत बहुतेक शिक्षक असून, त्याचे दुष्परिणाम अर्थातच विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत.
 बहुतेक प्रशिक्षण कार्यक्रम दिवाळीनंतर डिसेंबर महिन्यापासून सुरू झाले असून ते अजूनही सुरूच आहेत. प्रशिक्षणाच्या माऱ्यातून मुख्याध्यापकही सुटलेले नाहीत. प्रशिक्षणाची गरज शिक्षकांनाही मान्य आहे; परंतु ही सर्व प्रशिक्षणे जून महिन्यात व्हायला हवीत, शैक्षणिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असताना प्रशिक्षण देऊन उपयोग काय, असा सवाल जालना जिल्हातील एका शिक्षकाने केला. दर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शनिवारी सर्व शिक्षा अभियानांतर्गत होणारी गटसंमेलने तर शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरली आहेत. संमेलनाचा विषय आपल्या अध्यापनाचा नसला तरी शिक्षकांना या संमेलनाला हजेरी लावावी लागते, असे चेंबूरमधील एका शिक्षकाने सांगितले.
वेळ चुकते आहे हे मान्य  प्रशिक्षणांची वेळ चुकते आहे आणि अनेक प्रशिक्षण कार्यक्रम एकाच वेळी शिक्षकांवर लादले जात आहेत, ही बाब 'महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे'चे (एससीईआरटी) संचालक एन. के. जरग यांनी मान्य केली. 'एससीईआरटीचे प्रशिक्षण कार्यक्रम डिसेंबपर्यंत आटोपण्याकडे आमचा कल असतो, मात्र आता सुरू असलेली बहुतांश प्रशिक्षण कार्यक्रम सर्व शिक्षा अभियान आणि माध्यमिक शिक्षा अभियानाची किंवा एखाद्या स्वयंसेवी संस्थेमार्फत राबविले जाणार आहेत. त्यांच्याकडून उशिरा सूचना आल्याने ती परीक्षेच्या तोंडावर ते राबवावे लागत आहेत. यात आमची भूमिका केवळ प्रशिक्षण कार्यक्रम आखून देण्यापुरती मर्यादित आहे,' असे स्पष्टीकरण त्यांनी केले. शिक्षकांना प्रामुख्याने एससीईआरटी, यशदा, राज्य शिक्षण मंडळ यांच्यामार्फत प्रशिक्षण दिले जाते. जिल्हा व तालुका स्तरावरील एससीआरटीईचा प्रशिक्षण कार्यक्रम राहून गेल्यास तो तिथल्या शिक्षणाधिकाऱ्यांचा प्रश्न आहे, असा खुलासा त्यांनी केला.
\

Sunday, 24 February 2013


     A A A << Back to Headlines     
अरुण टिकेकर
मराठी मुले-मुली इंग्रजी माध्यमाच्या शाळांत जातात म्हणून वैषम्य वाटायचे कारण नाही. त्यांना चांगले इंग्रजी आलेच तर त्यांची मराठीही सुधारेल. एक भाषा चांगल्या रीतीने शिकली तर दुसरी, तिसरी भाषा शिकणे सोपे होते. परभाषेबद्दल प्रेम पाहिजे, जिज्ञासा पाहिजे. मातृभाषेबद्दल वृथा अभिमान नको, आत्मीयता पाहिजे..! तकाळ असा होता की महाराष्ट्रात दोन, तीन किंवा अधिक भाषा येणार्‍यांचे प्रमाण भरपूर होते. एखादी भाषा येणे म्हणजे मार्केटमध्ये भाजीवाल्याशी त्याच्या भाषेत हुज्जत घालणे नव्हे. मातृभाषा नसलेल्या भाषेतील अर्थच्छटा, वाक्य-रचना आणि मागचा-पुढचा संदर्भ व्याकरणासहित येणे म्हणजे भाषा येणे. त्या भाषेत मत व्यक्त करण्याइतपत शब्द-संपदा असणे आणि त्या भाषेतील वाड्मयकृतींचे वाचन तसेच ती भाषा ज्यांची मातृभाषा त्यांच्याशी त्या भाषेतून संवाद साधता येणे, असे त्या भाषेतील चढत्या प्राविण्याचे निकष असतात. भाषेचे अर्धवट ज्ञान कसे हास्योत्पादक ठरते याचा नमुना म्हणून एका ब्रिटिश साहेबाने त्याच्या मराठी भाषक सहकार्‍याला लिहिलेले पत्र दाखविता येईल. त्याने लिहिले होते : ''माझी पत्नी व्याली, तिला एक नरपिल्लू झाले.'' भाषांतर करताना झालेल्या सर्वच गफलती अनवधानाने झालेल्या नसतात, त्या अज्ञानानेही झालेल्या असू शकतात. दर्जा पातळ करण्याच्या आजच्या काळात काही शब्द शिकता आले तरी नवी भाषा आपल्याला येऊ लागली, असा आपण ग्रह करून घेतो. 'दोन भाषांवर प्रभुत्व' असल्याचे शिफारस-पत्र कोणालाही पटकन द्यायला आपण तयार असतो. बहुतेक भाषांची आबाळ होत असताना आपल्याला दोन-तीन भाषांतील काही शब्द ज्ञात असण्याच्या बळावर आपण त्या भाषेवर प्रभुत्व असल्याची समजूत करून घेणार असलो तर काय म्हणायचे? वामन-पंडिताचीच साक्ष काढावी लागेल. ''जधी काही काही 'हरि, कवि' असे शब्द शिकलो! तधी मी सर्वज्ञ द्विप-सम मदे याच भरलो !! जधी काही नेणे म्हणुनि वदले पंडित मला! तदा माझा गर्व-ज्वर सकळही हा उतरला!!'' अशीच अनेकांची अवस्था.
काही दशकांपूर्वी प्रत्येक सुशिक्षिताला कमीत कमी दोन भाषा चांगल्या यायच्या. घरी शिकलेली मातृभाषा मराठी आणि शाळेत साहेबाने शिकवलेली इंग्रजी. अनेक अधिकचे म्हणून संस्कृत तर शिकायचेच, पण जमल्यास आणखी एखादी भाषा शिकायचे. १९ व्या शतकात भाषा-पटुत्वाची, भाषा-वृद्धीची चढाओढ लागली होती की काय कोण जाणे. सर्वांचे म्होरके होते बाळशास्त्री जांभेकर. भाषा-उद्यानातील गुल-बकावलीचे फूल म्हणता येतील असे. ते बहु-भाषा-पंडित होते. त्यांना ग्रीक आणि लॅटिन या अभिजात समजल्या जाणार्‍या भाषाही येत असत. स्वातंत्र्य-पूर्व काळात महाराष्ट्रातील सुशिक्षितांत द्वि-भाषिक तशीच त्रि-भाषिक मंडळी भरपूर होती. आता शिक्षणाचे लोण तळा-गाळापर्यंत पोहोचले आहे, पोहोचत आहे, ही निश्‍चित स्वागतार्ह बाब आहे. पण शिक्षणाच्या लोकशाहीकरणात भाषांचे बळी देणे क्रमप्राप्त होते का? मातृभाषेला पर्याय नाही, ती आलीच पाहिजे, चांगली आली पाहिजे, यात वाद नाही. इंग्रजी भाषा ही साहेबाने आपल्यावर लादलेली भाषा खरी; पण ती शिकल्यामुळे आपले नुकसान न होता लाभच झाला आहे, हे आपण का विसरत आहोत? वैश्‍विक ज्ञानाची कवाडे आपल्याला इंग्रजीमुळे खुली झाली आणि अखिल जगाशी आपला संवाद सुरू झाला, हे निखळ सत्य आहे.
इंग्रजी शिकल्यामुळे मराठी-भाषकांना इंग्रजीतून अन्य भाषकांशी संवाद करणे सोपे गेले. अनेक मराठी पिढय़ांनी मराठीतून लेखन केले, त्याप्रमाणे इंग्रजीतूनही लेखन केले, इंग्रजीतून व्याख्याने दिली. त्यांना देशाने नेतृत्व दिले, त्यांचे मोठेपण देशवासीयांच्या ध्यानात आले म्हणून. रानडे आणि टिळक केवळ मराठीत लिहीत वा व्याख्याने देत राहिले असते तर त्यांना अमराठी लोकांचे नेतृत्व मिळाले असते का? सर जदुनाथ सरकार यांनी इंग्रजीत इतिहास लिहिले. पण त्यांचे लेखन बंगालीतही प्रसिद्ध झाले. इतिहासाचार्य राजवाडे यांना इंग्लिश येत नव्हते असे नव्हे. तेही डेक्कन कॉलेजचे ग्रॅज्युएट होते. पण त्यांनी शपथ घेतली होती इंग्लिशमधून न लिहिण्याची. सर जदुनाथ सरकारांचे लेखन जगभर प्रसिद्ध झाले, इतिहासाचार्य राजवाड्यांचे लेखन मराठीपुरते र्मयादित राहिले. आज तर त्यांचे लेखन इंग्रजीत अनुवादित करण्यासाठीही माणसे नाहीत या महाराष्ट्रात.
भाषावार प्रांतरचना झाली, मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा झाली आणि इंग्रजीची आबाळ सुरू झाली. मराठीचीही आबाळ होत गेली. महाराष्ट्र-निर्मितीमुळे अधिकृतपणे एकभाषिकता आली. मेहनत न करू पाहणार्‍यांच्या ती पथ्यावर पडली. इंग्रजीमुळे आमची मराठी बिघडली आणि नंतर आमचे इंग्लिशही बिघडले, असा कांगावा करायला सारे मोकळे झाले. इंग्रजीबद्दल तिरस्काराची भावना नव्या पिढय़ात रुजवली गेली, तिने भाषा-व्यवहाराचाच महाराष्ट्रात बळी घेतला. अ-मराठी लोकांशी चाललेला संवाद संपविला. परिणामी, महाराष्ट्राचे नेतृत्वही गेले. पोकळ अभिमानाने सारा अनर्थ केला.
भाषेच्या बाबतीत आपले 'तोडी नाक तबला अने फोडी नाक पेटी' झाले आहे. संस्कृत भाषेचा पाया आपण तोडून टब् कालान्तर
     

     << Back to Headlines     

 
 
चंद्रावर आपण पाणी शोधतो आणि अजूनही गावांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी पोहचलेले नाही..शास्त्रज्ञांपुढे संशोधनातील ही नेमकी काय आव्हाने आहेत, संशोधनाच्या दिशा चोखळताना नेमके काय घडतेय? सामान्य माणूस 'विज्ञान-संशोधना'च्या परिघात नेमका कुठे आहे? असे अनेक प्रश्न आहेत..येत्या २८ फेब्रुवारी 'विज्ञानदिन'आहे आणि तो विद्यार्थी शाळा-महाविद्यालये, संशोधनकेंद्रातून साजरा करतील. पण भविष्यात विज्ञानात कोणती संशोधने होणे अपेक्षित आहेत, ज्यामुळे मुलभूत प्रश्न सुटतील, विज्ञान-तंत्रज्ञान खर्‍या अर्थाने लोकाभिमुख होईल याबाबत खास विज्ञानदिनानिमित्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी मांडलेले विचार.! ज्ञानात 'एक्सलन्स' आणि 'रेलेव्हन्स' हे दोन महत्वाचे प्रकार आहेत. एक्सलन्स म्हणजे गुणवत्ता. त्यात उत्कृष्ट संशोधन केले जाते. जगात या स्वरुपाच्या संशोधनाला 'वर्ल्ड क्लास' संबोधून नोबेल पारितोषिक मिळते. अशा संशोधनाला प्रतिष्ठेच्या नोबेलसोबतच 'फेलो ऑफ रॉयल सोसायटी' आदी जगप्रसिध्द पुरस्कार दिले जातात. अशा पुरस्कारांनी त्या त्या देशाचे नाव उंचावते. दुसरा प्रकार रेलेव्हन्स. या प्रकारात विज्ञानाचा उपयोग समाजाचा विकास करण्यासाठी, मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी केला जातो. विज्ञान जगतात असे म्हटले जाते की, एक्सलन्स आणि रेलेव्हन्स हे दोन्ही प्रकार कधीही एकत्रित येऊ शकत नाहीत. पण ही समजूतच खोडण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी प्रयत्न करायला हवेत. आपल्या संशोधकांनी 'एक्सलन्स आणि रेलेव्हन्स' या दोन्हींना एकत्रित आणायला हवे. यातूनच भारताचा खरा विकास साधता येईल आणि जागतिक संशोधनाबरोबरच आपल्या मुलभूत प्रश्नांनाही हात घालता येईल.
बहुतेकदा शास्त्रज्ञ संशोधन करताना ते जगप्रसिध्द जनरलमध्ये कसे प्रसिध्द होतील, याचा विचार करतो. पण आता शास्त्रज्ञांनी ही विचारधारा बाजूला ठेवण्याची आवश्यकता आहे. संशोधनाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी, त्यात बदल घडवून आणण्यासाठी कसा करता येईल, याची जाणीव प्रत्येक शास्त्रज्ञामध्ये निर्माण होणे गरजेचे झाले आहे.
अनेक देश म्हणतात की, आपल्याला कशाला संशोधन हवे आहे, विकसीत देश विज्ञानात संशोधन करतील आणि त्यातून तंत्रज्ञान, नवकल्पना (इनोव्हेशन) निर्माण होतील. ते संशोधन नंतर विकत घेऊन आपल्याला वापरता येईल. त्यासाठी वेगळा खर्च कशाला करायचा. त्याचपद्धतीचा विचार आपल्याही देशात केला जातो. मात्र काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम फक्त भारतीय शास्त्रज्ञच करू शकतात. मलेरिया व इतर काही गंभीर आजारांची उदाहरणे यासाठी देता येतील. याप्रकारच्या आजारांचा प्रादरुभाव आपल्या देशात जास्त आहे. अशा गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.

नागरिकांना फायदा होईल असे तंत्रज्ञान हवे
इनोव्हेशन..एक्सक्लूझीव इनोव्हेशन.. याचा फायदा केवळ o्रीमंतांनाच होतो. आयपॅड, आयफोन ही त्याची उदाहरणे. त्यांचा फायदा सामान्यांना होतो का? तर त्याचे उत्तर नाही हेच आहे. शास्त्रज्ञांनी असे तंत्रज्ञान विकसीत केले पाहिजे, ज्याचा फायदा सामान्य नागरिकांना होईल. याचे एक महत्वाचे उदहारण देता येईल, काही वर्षापूर्वी लॅपटॉप हा २ हजार डॉलरला मिळायचा. त्यामुळे तो एका विशिष्ट वर्गासाठीच र्मयादित होता. तो २00 डॉलरमध्ये मिळेल का, असे आव्हान 'न्यू मिलेनियम इंडियन टेक्नॉलॉजी लिडरशीप इनोव्हेशन' या योजनेच्या माध्यमातून आम्ही केले होते. तेव्हा त्यातून प्रेरणा घेऊन विनय देशपांडे यांनी २00 डॉलरमध्ये लॅपटॉप बनविला आणि तो बाजारात आला. त्यातून प्रेरणा घेवून 'आकाश' हा टॅबलेट बनविता आला. ज्याची किंमत अवघी ३५ डॉलर आहे. या अविश्‍वसनीय संशोधनामुळे आता स्वप्न मांडता येईल की, प्रत्येक शाळकरी मुलाकडे टॅब असेल आणि तो वहया-पुस्तकांचे ओझे वाहणार नाही. त्याला ते सगळे, इंटरनेट एक्सेस टॅबवर मिळेल. त्यामुळे तो संपूूर्ण जगाशी, जागतिक ज्ञानाशी जोडला जाईल. प्रत्येक मुलाला टॅब मिळाला तर शिक्षणात एक मोठी क्रांती होईल. २ हजार डॉलरचा लॅपटॉप २00 डॉलरमध्ये आणणे जगातील कोणत्याही शास्त्रज्ञाला शक्य वाटले नव्हते. पण ते भारताने करून दाखविले. नागरिकांना फायदा होईल, त्यांच्या रोजच्या जगण्यात त्याचा वापर होईल असेच संशोधन होणे आवश्यक आहे.

तंत्रज्ञानाने o्रीमंत-गरीबांमधील दरी वाढते
जगाकडे पाहिले तर तंत्रज्ञानाचा झालेला विकास आणि त्याच्या वाढलेल्या वापरामुळे o्रीमंत आणि गरीबांमधील दरी वाढत जाते. ही दरी कमी करायची असेल तर वेगळे मार्ग शोधायला हवेत. त्यासाठी संशोधन करीत असताना कंपन्या 'मोअर द्यान मोअर' असे म्हणतात. म्हणजेच, जास्त पैसे द्या तुम्हाला जास्त विकसीत तंत्रज्ञान देतो, असे कंपन्या ग्राहकांना सांगतात. तर दुसरीकडे गरीबांसाठी 'लेस द्यान लेस' हे तंत्र कंपन्या अवलंबितात. याचे उदाहरण द्यायचे झाले तर, रस्त्यावरची वाहतूक पाहिली तर असे दिसून येते की o्रीमंत व्यक्ती र्मसिडिझसारख्या महागडया गाडया वापरतात तर गरीब व्यक्ती सायकल, स्कूटर वापरतात. असे बोलणेही आता रूढ झाले आहे. पण हे चित्र बदलण्याचे टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी ठरविले आणि त्यांनी ते बदलले सुध्दा. गरीबांना स्कूटरच्या किंमतीत चारचाकी गाडी देता येईल ज्यामध्ये सोयी-सुविधा, सुरक्षितता यात कोणतीही तडजोड केलेली नसेल, असे स्वप्न त्यांनी पाहिले आणि ते 'नॅनो'च्या माध्यमातून प्रत्यक्षातही उतरविले. हा एक मोठा बदल आहे.
जगभर 'मोअर ा पान ८ वर
काय आजची तरुण पोरं-पोरी. कसली मराठी बोलतात..
व्याकरणाचा तपास नाही.. मराठीतून इंग्रजी बोलतात
की इंग्रजीतून मराठी हेच कळत नाही..
त्यामुळे मग मराठी वाचावासाठी आरडाओरडा करुन
किंवा प्रसंगी आडमुठेपणा करत
मराठीवरची अतिक्रमणं थांबवा म्हणणारी
ही पुष्कळशी लोकं आपल्या आजुबाजूला आहेत..
पण असं नुसतं भोकाडं पसरून चालणार आहे का?
तर मुळीच नाही.. मग काय करायचं तर,
मराठीची गोडी लावायची पण जरा हुशारीने.
मग पाहू मराठीचं नाणं कसं खणाणतं नाही..!! मराठी आणि महाविद्यालयीन तरुण
'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..'
छान वाटते नाही हे ऐकायला? ऐकताना उचंबळून वगैरे येते, नाही का? पण मला सांगा कोणत्याही कॉलेजात गेलात आणि दहा मुलामुलींना विचारले, 'खरेच असे वाटते का तुला? नुसते मराठी बोलणे किंवा ऐकणे हेच मोठे भाग्य वाटते का? धन्य वाटते का तुला?' माझा अंदाज आहे, जर ती मुले-मुली अगदी खरे बोलणारी असतील तर दहापैकी आठ जण म्हणतील, 'त्यात भाग्य किंवा धन्य वगैरे काय नाय वाटत. इट्स नॉट बॅड, पण चलता है..नो प्रॉब्लेम्स, यार !' या मुलांना मराठीबद्दल रागद्वेष वगैरे मुळीच नाही, पण नुसते चार मराठी शब्द ऐकू येण्यात किंवा बोलण्यात आयुष्याची इतिश्री किंवा महद्भाग्य वगैरे नाही वाटत. 'अरे यार आज इको को बंक मारा बरं का मैने,' असं म्हणण्याऐवजी 'मी आज अर्थशास्त्राच्या तासाला बसलो नाही बरे का,' असे म्हणण्याने काही यांच्या अंगावर रोमांच वगैरे नाही उभे राहात. कारण या 'उपयुक्ततावादी' संस्कृतीत मराठी त्यांना तसे आणि तितके मौलिक काही देऊ करत नाहीये. देऊ शकत नाहीये. त्यापेक्षा अगदी चाचपडत 'इंग्लिश विंग्लिश' शिकता येणो, बोलता येणो हे एखाद्या मध्यमवयीन बाईला देखील 'लाभले आम्हास भाग्य..' असेच वाटते.
याचे मूळ कारण आपल्या दांभिक स्वभावात आहे. थोर माणसांचे पुतळे उभारून टाकणे, १५ ऑगस्टला मनोजकुमारच्या सिनेमातली गाणी लावणे आणि मातृभाषेबद्दल 'अमृतातेही पैजा जिंके' किंवा 'लाभले आम्हास.' छापाची गोड गोड गाणी रिंगटोनवर टाकणो ही त्या दांभिकतेची सार्वत्रिक रूपे आहेत. आरशासमोर कपडे काढायचे तर आपल्याला विलक्षण तिटकारा आहे. उलट नवनवे कपडे आणि दागिने घालून आपण आरशात बघतो. पुतळे, गाणी आणि हे सगळे उद्योग असे आपल्या स्वत:ला झाकणार्‍या दागिन्यांसारखे असतात. आपले खरे रूप आपण लपवत राहतो.
मराठीतून अर्थशास्त्र आणि अकाउंटिंग शिकून पुढे मला नोकरी मिळण्यात काहीही फायदा होणार नाहीये हे आपण एकदाचं कबूल करून टाकावं की नाही? पण आपण ते कधीच नाही करणार. खरे तर चांगला पगार देणार्‍या कोणत्याच मोठय़ा कंपनीत असं मराठीत तेरजा आणि ताळेबंद नाही कुणी मांडत. डेबिट आणि क्रेडिटला कुणी 'जमा' आणि 'नावे' वगैरे नाही म्हणत . पण हे कबूल करून टाकत नाही आपण. ते अभ्यासक्रम चालू ठेवतो आपण. हा काही मातृभाषेविषयी आदर दाखवायचा सर्वोत्तम मार्ग नव्हे. ही आपली फसवणुक आहे. सात आठ छोट्या- मोठय़ा कंपन्यात काम करताना मी शेकडो इंटरव्ह्यू घेतले. अगदी ज्युनियर कारकुनाच्या जागेपासून पार सिनीयर मॅनेजरच्या पदापर्यंत सर्वांचे इंटरव्ह्यू घेतले. मराठी माध्यमातून बी. कॉम. केलेल्या कुणाला कधी इंटरव्ह्यूला देखील बोलावल्याचे मला स्मरत नाही. मात्र त्याचबरोबर हेही लक्षात घ्या, की कॉल सेंटरसाठी इंटरव्ह्यू घेताना चांगलं मराठी यायलाच हवं ही माझी मुख्य अट असे, हेही तितकंच खरं. सांगायचा मुद्दा म्हणजे आदर्शवादाने कितीही नाकारली किंवा धिक्कारणी केली तरी उपयुक्ततावादी संस्कृती टाळून पुढे जाणे अवघडच आहे आता. यासंदर्भात मराठी भाषेची हुशार (= स्मार्ट) 'प्लेसमेंट' करणे आवश्यक आहे. नुसते खोटे खोटे 'लाभले आम्हास भाग्य..' म्हणून फायदा नाही. त्यापेक्षा हुशारीने आणि व्यावहारिक शहाणपणाने मराठीची गुणवत्ता ओळखून तिची 'वादातीत उपयुक्तता' पटवून द्यायला हवी तरुण पिढीला. काय आहे ही वादातीत उपयुक्तता ? आणि कशी पटवून द्यायची ती? याबाबत काही महत्वाचे मुद्दे मांडतो.
मराठीची वादातीत उपयुक्तता
१. आपल्या भावनांची सर्वोत्कृष्ट आणि उत्स्फुर्त अभिव्यक्ती मातृभाषेतूनच होत असते. त्यामुळे उत्कट आनंद आणि दु:खाच्या प्रसंगी आपल्या मनाचे विरेचन मातृभाषेतून केल्याने अधिक समाधान लाभते. तो क्षण सर्वर्थाने साजरा होतो.
२. मोठय़ा कंपन्या ग्राहकांशी संपर्क साधताना ग्राहकाच्या मातृभाषेतच संपर्क साधून आपले देशीपण अट्टाहासाने सिद्ध करतात. त्यातून त्या प्रतिस्पध्र्यापासून आपले वेगळेपण आणि जास्तीचे ग्राहकप्रेम सिद्ध करत असतात, त्यामुळे त्या क्षेत्रात उत्तम मराठीचे ज्ञान अत्यावश्यक मानले जाते. ही संधी मानली पाहिजे.
३.लिखित कलाकृतीचा आस्वाद घेताना वाचन अणि आकलन अशा दोन अवस्था असतात, त्यात भाषांतराची तिसरी अवस्था आपल्या मेंदूत नेणीवेत घडते तेव्हा अधिक श्रम पडतात आणि आशयघटकांचा र्‍हास होतो. याचे कारण म्हणजे सर्व मुख्य संकल्पना मुळातून आपण मातृभाषेतून समजून घेतलेल्या असतात.
४. नोकरी मिळणे आणि टिकवणे हे आयुष्याचे अंतिम ध्येय मानले तर जगणे हा एक कंटाळवाणा उपचार होतो. याउलट आस्वाद आणि अभिव्यक्ती हे जगणे सुंदर करायचे अवश्यक पैलू मानले तर दोन्ही बाबतीत मातृभाषेमध्य रेखाचित्र : प्रकाश सपकाळे
 एखादी गृहिणी स्वयंपाक घरात शिरते... भाजी करायची म्हणून पात्रात तेलाची धार ओतते... तेल, कांदा, लसूण, आलं घालून सुगरण स्वयंपाक तयार करते.. घरातील सर्व मंडळी या पक्वान्नांचा आस्वाद घेतात. मात्र, इतरांच्या तोंडाला हा स्वाद आणणाऱ्या त्या तेली समाजाचे तोंड बेचवच असेल याची पुसटशी कल्पनाही कोणाच्या मनात येत नाही. होय! ही व्यथा आहे या समाजाची.

इतर मागास प्रवर्गात मोडणाऱ्या या तेली समाजाची राज्यभरातील लोकसंख्या 85 ते 90 हजारांच्या घरात आहे. पूर्वीपासून घालून देण्यात आलेल्या पायंड्यानुसार तेलघाणी चालविणे, तेलबियांचा व्यवसाय, शेती, आलू, कांदा, लसणाच्या व्यापाऱ्याच्या भरवशावर या समाजाचा उदरनिर्वाह चालतो. पण, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पाकीट बंद आणि ट्रिपल फिल्टर्ड तेलाची मागणी वाढल्याने या समाजबांधवांकडून चालविण्यात येत असलेल्या तेलघाण्या हळूहळू बंद पडल्या. आता तर बोटावर मोजण्या इतक्‍या ठिकाणीच त्या सुरू दिसतात.

मोठ्या कंपन्यांच्या तेल गिरण्यांना परवाने देताना राज्यकर्त्यांनी परंपरागत व्यवसाय करणाऱ्या या समाजाचा जराही विचार न केल्याने त्यांचा परंपरागत व्यवसाय मोडीत निघाला. ग्रामीण भागात शेती करून उदरनिर्वाह करणेही आता अवघड झाले. त्यामुळे प्रचंड स्पर्धेच्या या युगात टिकून राहण्यासाठी समाजातील युवापिढीला प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. ओबीसी आरक्षणात समाजाचा समावेश असल्याने उपलब्ध असलेल्या 13 टक्के आरक्षणातच या समाजाला सारं काही निभावून न्यावे लागते. प्रचंड आंदोलने केल्यानंतर कोठे ओबीसींना देण्यात येणारा शिष्यवृत्तीचा लाभ या समाजाच्या पदरात पडला. प्रगती साधण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर संघर्षच करावा लागत असल्याने इतरांचे भोजन स्वादिष्ट बनविणाऱ्या या समाजाच्या वाट्याला मात्र बेचवच आली आहे.

महामंडळाच्या मागणीला जोरतेली समाजाच्या विकासासाठी स्वतंत्रपणे संताजी महामंडळ अस्तित्वात यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. या महामंडळाच्या माध्यमातून तेली समाजाला शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, शिष्यवृत्ती, रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्या, अशी समाजबांधवांची अपेक्षा आहे. शिक्षणामुळे 50 टक्के समाज प्रगत झाला आहे. उर्वरितांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे झाले आहे.

Friday, 22 February 2013



अभयारण्य निसर्ग पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत वन्यजीव विभागाने मागच्या वर्षांत कळसुबाई-हारिश्चंद्रगड क्षेत्रात १ कोटी ६६ लाख रूपये खर्च केले आहेत. मुख्यत्वे रतनगड परिसराचा कायापालट करण्याचा प्रयत्न असल्याचे वनक्षेत्रपाल पी. टी. पाटील यांनी सांगितले.
अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, अमृतेश्वर मंदिर परिसर, रतनगडावरील २४ कुंडातील गाळ काढण्यात आला, गडावर सौरदिवे लावण्यात आले आहेत. तसेच कोकणात उतरणाऱ्या कल्याण पायऱ्यांच्या अवघड दुरुस्तीची कामे सध्या सुरू आहेत. भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रातील नऊ गावात पर्यटकांनी वेळ घालवावा, रमावे म्हणुन रतनवाडी येथे आकर्षक दगडी ओटे, त्यावर छत, सभोवताली हिरवळ विविध रंगीत फुलांची रोपे लावण्यात आली आहेत. प्रसिद्घ पांजरे बेटाचा विकास करुन तिथे नविन वृक्ष लागवडीबरोबरच वाहनतळ उभरण्यात आला आहे. प्रत्येक पॉईंटवर वीस प्रसाधनगृहे बांधली आहेत. पर्यटकांच्या विश्रांतीसाठी पॅगोडाही बांधले आहेत. पर्यटकांना पशुपक्षी निरीक्षणासाठी मोठे मनोरे उभरण्यात आले आहेत.
अभयारण्यात समाविष्ट करण्यात आलेल्या नऊ गावात तसेच प्रत्येक पॉईंटवर सौरदिवे लावण्यात आल्याने हा निसर्गरम्य परिसर उजळून निघाला आहे. सांदन दरी व घाटणदेवी येथे रेलींग करण्यात आले आहेत. रतनगडावर जाण्यासाठी अवघड असणारा मार्ग सोपा करुन चार नविन शिडय़ा बसविण्यात आल्या आहेत. तेथील रत्नाई देवीचे मंदिरही सुशोभित करण्यात आले आहे. पर्यटकांना आकर्षित करणारे धबधबे व त्याखालच्या रस्त्यांचीही दूरुस्ती करण्यात आली आहे. वनविभगाकडे कर्मचारी वर्ग कमी असुनही दिवस-रात्र काम करुन ही कामे निर्धारीत वेळेत पुर्ण करण्यात आली आहेत. वनपाल बी. डी. शिंदे, आर. जी. बुळे यांची त्याकामी मोठी मदत झाल्याचे पाटील यांनी सांगितले. पर्यटकांकडून होणारे उत्पन्नही आता वर्षांगणिक वाढत असल्याची माहिती त्यांनी दिली.














अभयारण्य निसर्ग पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत वन्यजीव विभागाने मागच्या वर्षांत कळसुबाई-हारिश्चंद्रगड क्षेत्रात १ कोटी ६६ लाख रूपये खर्च केले आहेत. मुख्यत्वे रतनगड परिसराचा कायापालट करण्याचा प्रयत्न असल्याचे वनक्षेत्रपाल पी. टी. पाटील यांनी सांगितले.
अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, अमृतेश्वर मंदिर परिसर, रतनगडावरील २४ कुंडातील गाळ काढण्यात आला, गडावर सौरदिवे लावण्यात आले आहेत. तसेच कोकणात उतरणाऱ्या कल्याण पायऱ्यांच्या अवघड दुरुस्तीची कामे सध्या सुरू आहेत. भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रातील नऊ गावात पर्यटकांनी वेळ घालवावा, रमावे म्हणुन रतनवाडी येथे आकर्षक दगडी ओटे, त्यावर छत, सभोवताली हिरवळ विविध रंगीत फुलांची रोपे लावण्यात आली आहेत. प्रसिद्घ पांजरे बेटाचा विकास करुन तिथे नविन वृक्ष लागवडीबरोबरच वाहनतळ उभरण्यात आला आहे. प्रत्येक पॉईंटवर वीस प्रसाधनगृहे बांधली आहेत. पर्यटकांच्या विश्रांतीसाठी पॅगोडाही बांधले आहेत. पर्यटकांना पशुपक्षी निरीक्षणासाठी मोठे मनोरे उभरण्यात आले आहेत.
अभयारण्यात समाविष्ट करण्यात आलेल्या नऊ गावात तसेच प्रत्येक पॉईंटवर सौरदिवे लावण्यात आल्याने हा निसर्गरम्य परिसर उजळून निघाला आहे. सांदन दरी व घाटणदेवी येथे रेलींग करण्यात आले आहेत. रतनगडावर जाण्यासाठी अवघड असणारा मार्ग सोपा करुन चार नविन शिडय़ा बसविण्यात आल्या आहेत. तेथील रत्नाई देवीचे मंदिरही सुशोभित करण्यात आले आहे. पर्यटकांना आकर्षित करणारे धबधबे व त्याखालच्या रस्त्यांचीही दूरुस्ती करण्यात आली आहे. वनविभगाकडे कर्मचारी वर्ग कमी असुनही दिवस-रात्र काम करुन ही कामे निर्धारीत वेळेत पुर्ण करण्यात आली आहेत. वनपाल बी. डी. शिंदे, आर. जी. बुळे यांची त्याकामी मोठी मदत झाल्याचे पाटील यांनी सांगितले. पर्यटकांकडून होणारे उत्पन्नही आता वर्षांगणिक वाढत असल्याची माहिती त्यांनी दिली.

Wednesday, 20 February 2013

बारावीच्या वर्षांत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गैरहजेरी असलेल्या २१ विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयाने घेतला आहे. पण संबंधित विद्यार्थ्यांनी त्यामागील शैक्षणिक शिस्तीचा दृष्टिकोन अमान्य करत आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्य़ातील शैक्षणिक वातावरणासाठी नावाजल्या जाणाऱ्या या महाविद्यालयात दर वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी परवानगी (हॉल तिकीट) देताना त्यांची वर्षभरातील हजेरी आणि शैक्षणिक गुणवत्ता गंभीरपणे विचारात घेतली जाते. यंदाच्या वर्षी या निकषानुसार एकूण ९७ विद्यार्थ्यांपैकी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गैरहजेरीच्या कारणास्तव बारावीच्या परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्याम जोशी आणि संचालक मंडळाने घेतला होता. पण त्यापैकी ७६ विद्यार्थ्यांची खेळ व कला क्षेत्रातील कामगिरी आणि एकूण गुणवत्ता लक्षात घेऊन परीक्षेसाठी हॉल तिकीट देण्यात आले. उरलेल्या २१ विद्यार्थ्यांची मात्र गैरहजेरीबरोबरच शैक्षणिक गुणवत्ताही अतिशय निकृष्ट असल्याचे आढळून आल्याने त्यांना परीक्षेला बसू न देण्याच्या निर्णयावर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संचालक मंडळ ठाम राहिले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागीय संघटक वैभव खेडेकर यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून संबंधित विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाशी पालकांसह चर्चा केली. पण संचालक मंडळाने आपला निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे परीक्षेसाठी परवानगी नाकरण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
या दबाव तंत्राबद्दल स्पष्ट नापसंती व्यक्त करून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जोशी 'लोकसत्ता'शी बोलताना म्हणाले की, या विद्यार्थ्यांबद्दल आमच्या मनात अजिबात आकस नाही. पण महाविद्यालयात शैक्षणिक वातावरण टिकवू ठेवण्यासाठी ही कारवाई आवश्यक आहे. संबंधित २१ मुलांना परीक्षेला बसू दिले तरी ती उत्तीर्ण होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. त्या पेक्षा त्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करून ऑक्टोबरमध्ये परीक्षा दिली तर गुणवत्ता सुधारेल आणि त्यांच्याच भावी वाटचालीसाठी ते फायदेशीर होईल. गेल्याही वर्षी महाविद्यालयाने याच कारणास्तव १७ विद्यार्थ्यांना परीक्षेला परवानगी नाकारली होती. अशा कारवाईद्वारे किमान शैक्षणिक दर्जा टिकवून ठेवण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न आहे. कारवाई करण्यात आलेल्या २१ जणांपैकी १४ विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना ही भूमिका पटवून देण्यात यश आले असल्याचेही प्राचार्य जोशी यांनी नमूद केले.
आपले पर्यावरण हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यामागे असलेला महत्त्वाचा हेतू म्हणजे ज्या तुमच्या पिढीवर भविष्यातील भारताचे भवितव्य अवलंबून असणार आहे, त्या पिढीमध्ये पर्यावरणाविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी हा आहे. त्यामुळे या विषयाचे महत्त्व तुम्हाला मिळणाऱ्या गुणांच्याही पलीकडे आहे. पर्यावरणाचा अभ्यास यापुढील काळात एक व्यक्ती म्हणून जसा अत्यावश्यक असणार आहे तसाच तो ‘डोळे उघडे’ ठेवून केल्यास तुमचा ताणतणाव हलका करणारा असणार आहे. तुम्ही केलेल्या प्रकल्पालाही तेवढेच महत्त्व असणार आहे. या अभ्यासक्रमातून मिळणाऱ्या मूलभूत माहितीचा वापर करून तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या पर्यावरणीय घटनांकडे तुम्ही कसे पाहता हे तुमच्या उत्तरांमधून तसेच प्रकल्पामधून ताडले जाणार आहे. आजूबाजूच्या घटनांबद्दल तुम्ही जेवढी अधिक माहिती द्यल तेवढी तुमची जागरूकता अधिक आहे असे परीक्षकांच्या लक्षात येईल. त्यासाठी आपल्या घरी दररोज येणारा ‘लोकसत्ता’ व्यवस्थित वाचणे महत्त्वाचे आहे.
विभाग पहिला- प्रदूषण
हवा, पाणी आणि माती हे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे घटक आहेत. आपल्या आजूबाजूला डोळसपणे पाहिले तरी या तिन्हींसंदर्भात होत असलेले प्रदूषण अगदी सहज लक्षात येईल. तुम्ही शहरात राहात असाल तर अनेक वर्तमानपत्रांमध्ये दररोज होत असलेल्या वायुप्रदूषणाची आकडेवारी प्रसिद्ध होत असते. शहरामध्ये असलेली महापालिका त्याचप्रमाणे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रयोगशाळा त्यासंदर्भातील आकडेवारी प्रसिद्ध करत असते. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाइटवरदेखील ैै.स्ज्म्ं.ुदन्.ग्ह त्याची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. पुस्तकात दिलेला प्रदूषक वोोत हा तक्ता मंडळाच्या आकडेवारीशी ताडून पाहता येईल. मग सर्वाधिक प्रदूषण करणारे प्रदूषक कोणते हे तुम्हालाच लक्षात येईल. या वायुप्रदूषणाबरोबरच महत्त्वाचे असते ते ध्वनिप्रदूषण. शहरामध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आढळते. सध्या शहरात गणेशोत्सव तसेच नवरात्रौत्सवादरम्यान होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा मोठा वाद सुरू आहे. ही समस्या मोठी असल्याने थेट सर्वोच्च न्यायालयानेही त्यात लक्ष घातले आहे. दिवसा ध्वनिप्रदूषणाची मर्यादा ५५ डेसिबल्स (डेसिबल हे ध्वनीची तीाता मोजणारे परिमाण आहे) तर रात्रौ ४५ डेसिबल्स असावी असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. मात्र अनेक ठिकाणी या दोन्ही मर्यादा धाब्यावर बसविल्या जातात.
नदी, नाले, तलाव आदीमधून जलप्रदूषण मोठय़ा प्रमाणावर होत असते, याचा थेट संबंध माणसाच्या जीवनाशी आहे. त्याचे कारण पाणी हा सजीवांसाठी जीवनाश्यक घटक आहे. नदीमध्ये कपडे धुणे किंवा प्राण्यांना आंघोळ घालणे गावाकडे पाहायला मिळते, तर औद्येगिकीकरण झालेल्या भागात किंवा शहरात कारखान्यातील रासायनिक प्रक्रिया केलेले पाणी किंवा सांडपाणी तसेच नाल्यांमधून सोडले जाते. जलप्रदूषणाचे हे दोन महत्त्वाचेोोत आहेत. पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण त्यामुळे जगभरात सर्वत्रच कमी होत असून येणाऱ्या काळात जगात यादवी युद्ध झाले तर ते पाण्यावरून होईल असा सूचक इशारा म्हणूनच तर संयुक्त राष्ट्र संघाने (युनायटेड नेशन) दिला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये माती किंवा मृदेमध्ये होणारे प्रदूषणही मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा प्रमाणाबाहेर झालेला वापर हे त्याचे प्रमुख कारण आहे. अगदी अलीकडे अभिनेता अमिर खान याने ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमातून त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सेंद्रिय खते किंवा सेंद्रिय शेती हा त्यावरचा महत्त्वाचा पर्याय असू शकतो. अनेकदा एखादी गोष्ट अर्थव्यवस्थेला जोडली गेली की त्याचे चांगले-वाईट परिणाम पाहून त्यावर कार्यवाही होते असे लक्षात आले आहे. रासायनिक खतांचा वापर करून पिकविलेली फळे- भाज्या मध्यंतरी युरोपिय राष्ट्रांनी परत पाठविल्याने भारताला मोठा फटका सहन करावा लागला. त्या अनुभवाने शहाणे झालेले अनेक शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत.
या सर्वाच्या पलीकडे प्लास्टिक या प्रदूषकाने सर्वानाच जेरीस आणले आहे. प्लास्टिक हे अविघटनशील आहे. भारतात अलीकडे प्लास्टिकच्या थैल्यांचा वापर अमाप पद्धतीने वाढला आहे. कमी जाडीच्या प्लास्टिकच्या थैल्यांवर पुनप्र्रक्रिया व वापरही होत नाही, त्यामुळे त्या निसर्गात तशाच पडून राहतात. प्लास्टिक ही सध्या आपल्यासमोरची सर्वात मोठी समस्या आहे. पुनप्र्रक्रिया व पुनर्वापर हा त्यावरचा प्रभावी तोडगा. डॉ. विकास आमटे यांनी ‘आनंदवना’त त्यावर उत्तम तोडगा शोधून काढला आहे. गुटख्याची पाकिटे, प्लास्टिकच्या थैल्या गोळा करून त्यावर प्रक्रिया करून गाद्य तयार केल्या जातात. तर प्लास्टिक आणि फेकून दिलेल्या टायर्सचा वापर करून त्यांनी स्पीडब्रेकर्स आणि पाणी अडविण्यासाठीचे बंधारे तयार करून एक नवा आदर्श सर्वासमोर ठेवला आहे. अशा कल्पक पद्धती पणाला लावल्या तरच पर्यावरणाच्या समस्येवर मानवाला यशस्वीरीत्या मात करता येईल.
विभाग दुसरा- पुनर्वसन आणि पुनस्र्थापना
पाणी आणि वीज या आपल्या वाढत्या लोकसंख्येसमोरील दोन महत्त्वाच्या गरजा आहेत. पाणी जसे पिण्यासाठी लागते तसेच ते शेतीसाठीही लागते. त्यामुळेच पाण्याचे नियोजन करून त्यातून जलविद्य्ुतनिर्मिती करण्यासाठी मोठे प्रकल्प अस्तित्वात येतात, मोठी धरणे बांधली जातात. धरण जेवढे मोठे तेवढेच पाण्याखाली येणारे क्षेत्रही मोठे. मोठय़ा धरणांमुळे विस्थापितांची संख्या तर मोठी होतेच, पण पुनर्वसनाचे कामही वाढते. आता त्यामुळेच मोठय़ा संख्येने लहान आकाराचे बंधारे बांधून किंवा धरणे बांधून नियोजन करण्याची कल्पना पुढे आली आहे. या लहान प्रकल्पांमुळे पुनर्वसन आणि पुनस्र्थापना या समस्या तुलनेने कमी होतील अशी अपेक्षा आहे.
ऊर्जेच्या समस्येवर मात करण्यासाठी ऊर्जा बचत याबरोबरच आपल्याकडे मुबलक उपलब्ध असलेल्या सूर्याच्या उन्हाचा अर्थात सौर ऊर्जेचा वापर हा भारतासारख्या देशासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र त्यासाठी सौर ऊर्जेसंदर्भात अधिक संशोधन होऊन नवीन उत्पादने बाजारात येणे आवश्यक आहे. सौर ऊर्जा वापरणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कंेद्र सरकारने आता नव्या योजनाही आणल्या आहेत.
समुद्र, शेती आणि जंगल हे तीनही घटक समाजासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. पहिल्या दोन घटकांवर प्रदूषणामुळे तर जंगलावर बेसुमार वृक्षतोडीमुळे संक्रांत आली आहे. प्रदूषण कमी करणे हा समुद्र आणि शेती यांच्या बाबतीतील महत्त्वाचा उपाय आहे. अलीकडे झालेल्या अभ्यासात असे लक्षात आले आहे की, मोठय़ा व्यापारी जहाजांमध्ये किंवा युद्धनौकांमध्ये त्यांचा तोल कायम राखण्यासाठी बलास्ट टँकमध्ये समुद्रातील पाणी
alt
प्लास्टिक आणि टायर्सचा वापर करून आनंदवनात बांधण्यात आलेला बंधारा.
मोठय़ा प्रमाणावर भरले जाते. दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर सामान चढविताना तो टँक रिकामा केला जातो. एका ठिकाणचे प्रदूषित पाणी या पद्धतीने दुसरीकडे जाते. या माध्यमातून होणारे समुद्रातील प्रदूषण टाळावे यासाठी आता नवीन आंतरराष्ट्रीय मानके अस्तित्वात आली आहेत.
विभाग तिसरा व चौथा- संवर्धन व चांगल्या पर्यावरणासाठी प्रयत्न
आपल्याला दिसलेली प्लास्टिकची थैली किंवा कचरा गोळा करणे हेदेखील निसर्गाच्या संवर्धनातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. माणूस ज्या परिसरात राहतो त्या परिसराशी त्याचे भावनिक नाते तर असतेच, पण अनेकदा त्याच्या आर्थिक बाबीही तिथे जोडलेल्या असतात. म्हणजेच जंगलात राहणाऱ्यांचा उदरनिर्वाह हा अनेकदा त्या जंगलावरच अवलंबून असतो. याचेच भान आल्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये नागरिकांचा सहभाग असलेले संवर्धनाचे नवे धोरण अस्तित्वात आले आहे. आपल्या पुस्तकात दिलेले मेंढालेखाचे उदाहरण हे त्यातीलच एक आदर्श होय.
पर्यावरणाचा अभ्यास करताना आपल्याकडील महत्त्वाच्या पर्यावरणीय चळवळींची माहिती घेणे हे महत्त्वाचे आहे. प्रकल्प म्हणूनही त्याचा विचार केला जाऊ शकतो. गेल्या अनेक वर्षांमध्ये माणसाने जंगलांमध्ये अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मनुष्य-प्राणी संघर्षांसारख्या अनेक नव्या समस्यांना तोंड द्यवे लागत आहे. यासारखे नवे मुद्दे घेऊनही प्रकल्प करता येतील. पण हे करण्यापूव्??र्ाी चिपको किंवा सायलेंट व्हॅली प्रकल्पांसंदर्भातील महत्त्वाच्या पर्यावरणीय चळवळींची अधिक माहिती घेऊन नंतर प्रकल्प करणे अधिक हिताचे ठरेल. पर्यावरण प्रकल्पासाठी आपल्या आजूबाजूचे विषय घेता येतील. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. गणपतीला वाहिली जाणारी पत्री या सर्व औषधी वनस्पती आहेत. त्यांची माहिती देणारा एक सुंदर प्रकल्प त्यानिमित्ताने आकारास येऊ शकतो. या विषयात तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि विविध बाबींची माहिती तुम्ही जेवढी द्यल तेवढीच तुमच्यासाठी अधिक श्रेयस्कर असेल.

अभिनव' शाळा

विद्यार्थ्यांच्या मनात डोकावून व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करताना वक्तृत्व, लेखन, संभाषण, संवाद, क्रीडा, चित्र, अभिनय, नृत्य, गायन, वादन या कलांसह सामाजिक जाणिवा निर्माण करणारी ही 'अभिनव' शाळा.
व्यसनाधीनतेपासून परावृत्त करून माणूस घडविणारी पूर्णा जिल्ह्य़ातील परभणी येथील अभिनव विद्या विहार ही 'अभिनव' शाळा होय.
१९५३ साली शहरातील काही व्यापाऱ्यांनी सदर शाळेची स्थापना केली.
शाळेची प्राथमिक व माध्यमिक अशी वेगळी युनिटे असून, दोन हजारांवर विद्यार्थी शिकतात. ग्रामीण भागासह शहरातील दलित, मुस्लीम व इतर मागासवर्गीयांचे प्रमाण ७० टक्क्यांच्या वर असूनही गुणवत्तेची परंपरा राखली आहे. शाळेत भौतिक सुविधांसह आज अद्ययावत संगणक शाळा, विज्ञान प्रयोगशाळा, भव्य ग्रंथालय, वाचनालय व क्रीडांगण उपलब्ध आहे.
शाळेने तीन पिढय़ांचा वारसा जपला आहे. हजारो विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षणासाठी अथवा नोकरीसाठी रवाना झालेले आहेत. शाळेने नामवंत वकील, आमदार, खासदार घडविले. राज्याच्या प्रशासकीय सेवेत मोठय़ा हुद्दय़ावर आजही अनेक विद्यार्थी काम करताना शाळेचा अभिमानाने उल्लेख करतात.
शाळेने स्वत:ची शिस्त निर्माण केली आहे. विशिष्ट अशा परिपाठातून मूल्यशिक्षण, विविध जयंती, पुण्यतिथीच्या उपक्रमांतून चरित्र शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रमातून लोकशिक्षणाचे धडे येथे दिले जातात. वेगवेगळ्या स्पर्धाच्या माध्यमातून कलांचे दर्शन घडविले जातेच, पण व्यक्तिभिन्नता तपासून कलागुणांचा शोध घेत विद्यार्थ्यांतील व्यक्तिमत्त्वाचा शोध घेतला जातो. मुलांमध्ये वाचन लेखनाची आवड निर्माण करण्यासाठी 'मयूर' हस्तलिखिताचे संपादन केले जाते. माजी विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करून त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी मोलाचे ठरावे यासाठी विशेष उपक्रमांचे आयोजन केले जाते.
शाळा दरवर्षी दूरदूरच्या शैक्षणिक सहलींचे आयोजन करते. महाराष्ट्राबाहेरही सहलींचे आयोजन करून प्रकल्प भेटी, कारखान्याच्या भेटी, कार्यालयांना भेटी देऊन त्यांच्या कामकाजाची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली जाते. शाळा विविध उपक्रम राबविते. वृक्षारोपण, रक्तगट तपासणी, आपद्ग्रस्तांसाठी मदत फेरी, साक्षरता फेरी, बेटी बचाव फेरी, पल्स पोलिओ मोहीम, एड्स जागृती उपक्रम, व्यवसाय मार्गदर्शन शिबीर, खरी कमाई, राष्ट्रीय छात्र सेना दिवस यातून सामाजिकता जपली आहे.
दहावीचा निकाल उंचावण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. आगाऊ सराव परीक्षा, घटक चाचण्या यासह शिक्षक मुलांच्या गृहभेटी घेऊन पालक विद्यार्थी यांच्या समस्या जाणून घेतात. शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, नवोदय प्रवेशपरीक्षा मार्गदर्शन आदींसह वेगवेगळ्या विषयांच्या विविध परीक्षाही घेतल्या जातात.
शाळेने ई-लर्निग क्लास रूम अद्ययावत तयार केली असून माध्यमिक स्तरातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होतो. उत्कृष्ट संगणक कक्ष असून विद्यार्थी इंटरनेटचाही वापर चपखलपणे करतात. परिपाठात मराठी दिन, विज्ञान दिन, हुतात्मा दिन साजरे केले जातात. विज्ञान प्रदर्शनात शाळेचे प्रयोग राज्यस्तरापर्यंत अनेकदा पोहोचले.
राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र आर.डी. परेडपर्यंत पोहोचले. अनेक विद्यार्थी सैन्यात भरती होऊन श्रीलंकेच्या शांतिसेनेतही सामील झाले. अनेकांनी मेजपर्यंत मजल मारली.
शाळेने रौप्यमहोत्सव, सुवर्णमहोत्सवही साजरा केला. शाळेत आजही विद्यार्थी घडविण्याचे काम अव्याहतपणे चालू आहे. स्वयंशिस्तीला विशेष महत्त्व दिले जाते. सर्व जाती-जमातीतील विद्यार्थी एकत्रपणे व मुला-मुलींचे सहशिक्षण पद्धतीने शिकणे चालू आहे. पारंपरिक शिक्षणाबरोबरच चार भिंतीपलीकडचे शिक्षण शाळा देत आली आहे व देत आहे. पंचक्रोशीत शाळेने नावलौकिक मिळविला आहे. तर अशी आहे अभिनव उपक्रमांची खाण 'अभिनव विद्या विहार' शाळा.
मुख्याध्यापक, अभिनव विद्या विहार प्रशाला,
पूर्णा जं. जि. परभणी. पिन- ४३१५११ महाराष्ट्र.
कप्पेबंद, साचेबंद वाटांनी न जाता आमच्यातलेच काही शिक्षक वेगळ्या वाटा चोखळताना दिसतात. आपलं शिकणं हे जगण्याचा भाग बनविताना दिसतात. हसतखेळत, मुलांच्या कलानं जाणारं हे शिक्षण दीर्घकाळ टिकतं. मुलांना जगायला शिकवतं आणि जीवन संजीवनी पुरवतं, असा अनुभव आहे. तुमच्या शाळेतही 'असे चिरंतन शिक्षण' देणारे  उपक्रम सुरू असल्यास आम्हाला जरूर कळवा. उपक्रमांची माहिती पाठविताना छायाचित्रेही जरूर पाठवावी. संपर्कासाठी पत्ता- 'चिरंतन शिक्षण' लोकसत्ता, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१.
दूरध्वनी- ६७४४००००. फॅक्स-२२८२२१८७
reshma.murkar@expressindia.com,  reshma181@gmail.com

Published: Sunday, February 17, 2013
शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर आणि त्यांचे सहा सहकारी यांनी बहलोलखानाशी एकाकी झुंज देऊन बलिदान दिले ते ठिकाण म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्य़ातील गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी खिंड. इथली शतक पार केलेली प्राथमिक शाळा. या शाळेचे काळानुरूप रूपडे बदलत चालले आहे.
नवनवीन वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञान यामुळे शिक्षणाचे व व्यवसायाचे जग यात एक दरी निर्माण झालेली दिसते. ती कमी करण्यासाठी शिक्षण सामाजिक गरजांशी निगडित असले पाहिजे हे लक्षात घेऊन शाळेने मुलांना हस्तकलेचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देऊन काही उपक्रम राबविण्याचे ठरविले. शिक्षणक्रमातही त्याला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.
या हस्तकौशल्याचा उपयोग मुलांच्या पुढील आयुष्यात होणे सहज शक्य आहे.
नवनिर्मिती, जिज्ञासा, आत्मप्रकटीकरण या सहज प्रवृत्तींचा आविष्कार करण्याची संधी मुलांना बालवयातच दिली पाहिजे. भविष्यातील विविध उद्योगांतील कौशल्य व क्षमता संपादन करण्याचा पाया बालवयातच घातला जातो. मुलांच्या मनातील कल्पनांना कृतीद्वारे प्रकट रूप दिल्यास मुलांचा आत्मविश्वास वाढतो असा अनुभव येतो.
कार्यानुभव विषय गांभीर्याने व कौशल्याने नियोजनपूर्वक राबविण्याचे ठरवून काम करीत असल्यामुळे पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञानाची जोड मिळत असल्याची भावना मुलांमध्ये निर्माण झाली. कोणतेही काम कमी महत्त्वाचे नाही हा संस्कार आपोआपच घडला आणि स्वावलंबनाचे महत्त्वही त्यांना समजले.
कार्यानुभवांतर्गत राबवले जाणारे उपक्रम
१) शून्य कचरा :
कचऱ्याचे व्यवस्थापन करून ओला कचरा व सुका कचरा असे त्याचे वर्गीकरण मुलांकडून करून घेतले जाते. त्याचा पुनर्वापर करण्याचे तंत्र शिकवले जाते.
२) उत्पादक उपक्रम :
भाजीचे वाफे, वृक्षारोपण, बागकाम, राख्या तयार करणे, वॉलपीस तयार करणे या उपक्रमांनी नेहमीच कृतिप्रवणेतला चालना दिली जात आहे.
३) कागद काम :
१. घडीची किमया, २. कातरकाम (फुले), ३. शोभिवंत कागदी वस्तू तयार करणे.
४) टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती  :  करवंटय़ांपासून शोभिवंत वस्तू, बाटल्या, बल्ब, काडय़ांपासून शो-पीसनिर्मिती.
या तयार केलेल्या वस्तूंचे वर्षांअखेरी प्रदर्शन मांडले जाते. त्यांना अधिकारी, पालक  भेट देतात व मुलांचे कौतुक त्यांच्याकडून होते.
या उपक्रमाबरोबरच शाळेत इतरही उपक्रम राबवून सर्वागीण विकास साधण्याचा शिक्षकांचा सतत प्रयत्न असतो.
कांही नोंद घेण्याजोगे उपक्रम -
१) त्यासाठी हुशार विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले जात असल्याने शाळेतील ७४ विद्यार्थी राज्य शिष्यवृत्ती मिळवू शकले.
२) अप्रगत मुलांसाठी जादा तास व वैयक्तिक लक्ष पुरविले जाते.
३) वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी 'किशोर मंचची' स्थापना केली आहे.
४) पालक-संपर्क सातत्याने राहावा म्हणून शाळेत 'पालकांसाठी वाचनालय' हा उपक्रम राबविला जातो.
५) मासिक उपस्थिती १०० टक्के असेल त्या विद्यार्थ्यांला व त्याच्या पालकांना अभिनंदनाची पत्रे लिहून प्रोत्साहन दिले जाते.
या उपक्रमाबरोबर समविचारी शिक्षकांना एकत्र करून 'सृजन आनंद शिक्षक सहविचार मंच' असा एक मंच स्थापन केला आहे.
या मंचमध्ये परिसरातील व तालुक्यातील शाळांतील शिक्षक, शिक्षिका सभासद म्हणून सामील झाल्या असून, एक प्रकारचे उपक्रमशील शिक्षकांचे जाळेच तयार झाले आहे. महिन्यातील एका रविवारी एकत्र जमून आपल्या कामाचा आढावा घेतला जातो. अडचणींवर विचार केला जातो. नव्या पुस्तकांचे वाचन होते. सामुदायिक उपक्रम कोणते राबवायचे त्याचा विचार होऊन आखणी केली जाते. 'लेखन-वाचन' छंद वर्ग, बाल आनंद मेळावे, प्रश्नमंजूषा, मान्यवरांच्या मुलाखतींमधून जीवनानुभूतीचा आनंद सांस्कृतिक कार्यक्रमांतून कलेला वाव, सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवनासाठी कपडेदान, निधी गोळा करणे, 'लेखक-कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला' यात कवी प्रा. इंद्रजीत भालेराव, प्रा. विठ्ठल वाघ, प्रा. राजा शिरगुप्पे यांची भेट असे कार्यक्रम यात घेतले जातात.
या मंचमार्फत बाल साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. आतापर्यंत नीलम माणगावे, बाबा भांड, रजनी हिरळीकर, हेमा गंगातीरकर, मुकुंद निगवेकर, गोविंद गोडबोले यांसारख्या साहित्यिकांचे विचार शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांना ऐकायला मिळाले.
अशा रीतीने एक कृतिशील शाळा म्हणून शाळेचे रूपही बदलले आहे.
केंद्रशाळा, नेसरी, ता. गडहिंग्लज,
(मोबाइल- ०८००७११७०६६)
(हे उपक्रम शाळेच्या शिक्षिका शशिकला पाटील यांच्या कल्पनेतून साकारले आहेत.)
शिक्षणाच्या आशयाच्या सुधारणांसाठी महाराष्ट्रातील प्रयोगशील शाळांनी विकसित केलेला अध्यापन मूल्यमापन उपक्रम यांचा अभ्यास करून सार्वत्रिकीकरण केले पाहिजे. आजची प्रशिक्षणे प्रभावशून्य आहेत. प्रशिक्षणांची संख्या कमी करून प्रशिक्षणांची जबाबदारीच प्रयोगशील शाळांवर द्यावी. या शाळा सरकारी शाळांसाठी प्रेरणा होऊ शकतात.
प्रथम संस्थेने प्रसिद्ध केलेल्या 'असर' अहवालातून महाराष्ट्राच्या शिक्षणाचे जे विदारक चित्र पुढे आले आहे ते क्लेशदायक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिक्षणाची आणि सामाजिक चळवळींची पाश्र्वभूमी महाराष्ट्राला असल्याने महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा पुढेच असला पाहिजे पण आज तो बिहारपेक्षा मागे गेला आहे. पण आपल्याकडे एखादा असा अहवाल आला की एक तर त्या संशोधनाच्या पद्धतीलाच आव्हान द्यायचे किंवा हेतूंविषयी शंका घ्यायची आणि मूळ विषयावर चर्चाच करायची नाही असेच घडते.
वसंत पुरके शिक्षणमंत्री असताना महाराष्ट्राच्या शिक्षणात गुणवत्ता नाही, हे त्यांनी सतत मांडले. याची त्यांना किंमत चुकवावी लागली. त्यांनी केलेल्या पाहणीत २००५ साली ८ लाख विद्यार्थी अप्रगत निघाले. २००७ च्या पायाभूत चाचणीत ३१ लाख मुले अप्रगत होती. मी स्वत: याच काळात २०० शाळांमध्ये चाचणी घेतली तेव्हा ५११ वजा ४९९ ही वजाबाकी संपूर्ण बरोबर सोडविणारी चौथीची मुले अल्पसंख्येने आढळली. तो अहवाल मी 'शाळा आहे शिक्षण नाही' या नावाने प्रसिद्ध केला. त्या पुस्तकाची काही ठिकाणी होळी करण्यात आली. तेव्हा गेल्या ५ वर्षांत एकच निष्कर्ष सरकार किंवा स्वयंसेवी संस्थांकडून पुढे येतो आहे. हे सत्य स्वीकारले पाहिजे.
इतकी दुर्दशा शिक्षणाची झाली तरी दहावीच्या परीक्षेचे निकाल मात्र दरवर्षी वाढत आहेत. हा विनोद कसा समजून घ्यायचा? क्षमता प्राप्त न होताही मुलांना शाळा आणि महाविद्यालये पुढे ढकलत राहतात. याचा परिणाम म्हणून पदवीधर तरुण धड अर्जही लिहू शकत नाही. जागतिकीकरणात रोजगार फक्त कौशल्याधारित तरुणांनाच मिळेल पण कोणतीही कौशल्ये प्राप्त न झालेली पण पदवी घेतलेली बेकारांची फौज आम्ही शिक्षणातून बहुसंख्येने ग्रामीण भागात निर्माण केली आहे. २०११ची सुशिक्षित बेकारांची नोंदणी २६ लाख आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शिक्षणावरची श्रद्धाच डळमळीत व्हायला सुरुवात झाली आहे.
गुणवत्ताविहीन शिक्षणाचा परिणाम असा झाला की ज्याला लेखन-वाचन क्षमता येतात तोच विद्यार्थी शाळेत टिकतो. अन्यथा तणाव निर्माण होऊन शाळेतून गळती होते. आज उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण इतके प्रयत्न करूनही २०च्या पुढे सरकत नाही. याच्या अनेक कारणांपैकी त्या त्या इयत्तेत क्षमता प्राप्त न झाल्याने शिक्षणात रुची वाटत नाही. भीती वाढते हे आहे. गरिबी हे गळतीचे प्रमुख कारण नाही, हे अनेक अभ्यासातून सिद्ध झाले आहे. गरिबी हे जर गळतीचे कारण असते तर सर्वच दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांतील मुले गळती व्हायला हवी होती. पण तसे होत नाही. मी आजपर्यंत शेकडो शालाबाह्य़ मुले जवळून बघितली आहेत. अभ्यासात प्रगती असणारे मूल शालाबाह्य़ झाले असे अगदी क्वचितच आढळले आहे. 'असर' अहवालानेही क्षमता प्राप्त न झालेली मुले कोणत्या जात-संवर्गातील आहेत हे दिले नाही पण ही मुले आदिवासी दलित मुस्लीम याच जात-वर्गातील बहुसंख्येने असतात. या मुलांची हजेरी टिकविणं आणि त्यांच्या अंगभूत कौशल्यांना जर योग्य रीतीने हाताळले नाही तर शिक्षणाचा सांधा नीट जुळत नाही.
'असर' अहवालात महाराष्ट्राचे इतके वाईट चित्र निर्माण होण्याची कारणे कोणती असावीत. मला ७०० पेक्षा जास्त शाळांना भेटी दिल्यावर असे लक्षात येते की सरकारी शाळांमधील शिक्षक खासगी शाळेतील शिक्षकांपेक्षा हुशार आहे. हे शिक्षक निवडचाचणीत उतरलेले आहेत व त्या चाचणीत अनुत्तीर्ण शिक्षक खासगी शाळेकडे गेलेत. पण नोकरीत स्थिरावल्यावर स्थितीवादी होऊन आपल्या क्षमता अपवाद वगळता पूर्णपणे वापरल्या जात नाहीत व मुलांच्या क्षमता प्राप्तीविषयी उत्तरदायित्वाची प्रशासनाकडून विचारणाच होत नाही. हळूहळू नोकरीतील सुरक्षितता केवळ माहिती मागून मुलांविषयी विचारणा न करणारे प्रशासन यामुळे शिक्षकाची स्वयंप्रेरणा कमी होते. हा प्रेरणेचा होणारा लोप आणि प्रशासनाची कार्यसंस्कृती जाणे, ही कारणे प्रत्यक्ष शाळा फिरल्याशिवाय लक्षातच येत नाही, इतके हे अमूर्त कारण आहे.
शिक्षकाचे काम मोजले जात नाही हे वाचून कदाचित आश्चर्य वाटेल, पण मुलांना क्षमता प्राप्त होण्याचा आणि वेतनबढती-वेतनवाढ पुरस्कार यांचा कुठेही संबंध नसतो. माधव चव्हाण यांनी प्रत्येक वर्गात काय आले पाहिजे याच्या क्षमता नक्की करून त्याचा पाठपुरावा व्हावा असे मांडले. हे ठरलेले आहे पण त्याचा पाठपुरावा वर्षभर अधिकारीही करीत नाहीत व शिक्षकही प्रत्येक महिन्याला त्याचे सिंहावलोकन करून खात्री करीत नाहीत. वर्षांच्या शेवटी इन्स्पेक्शन होते व क्षमता प्राप्त न होता मुले पुढे ढकलली जातात, तरी काहीच कारवाई नसते. त्यामुळे नोकरीच शिक्षकांकडून क्षमतावृद्धी मागत नाही आणि तरीही मोबदला मात्र दिला जातो इतके भयावह चित्र आहे. तेव्हा शिक्षण सुधारायला फार वेगळे करायची गरज नाही. आहे त्याच प्रशासनाला नेमकेपणाने उद्दिष्ट देणे आणि दर तीन महिन्यांनी प्रत्येक वर्गातील क्षमता प्राप्तीचा आढावा घेणे एवढा जरी कार्यक्रम राबविला तरी ६० टक्केचित्र लगेच बदलेल याची मला खात्री आहे. कारण शिक्षकाचा स्वभाव हा मागेल त्याप्रमाणे काम करण्याचा आहे. प्रशासनाचा जर अप्रगत मुले हा प्राधान्यक्रम झाला तर शिक्षकही या मुलांकडे जास्त लक्ष देतील.
कार्यसंस्कृती ही वरून खाली वाहते. तेव्हा शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख यांच्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. इतर खात्याचा अधिकारी आणि शिक्षण खात्याचा अधिकारी यात फरक आहे. हा अधिकारी मनाने शिक्षकच असला पाहिजे. शिक्षणतज्ज्ञ असला पाहिजे. एकाच वेळी त्याने वर्गाचे कठोर मूल्यमापन आणि मार्गदर्शन करून प्रेरणाही दिली पाहिजे. त्यासाठी अधिकाऱ्यांचीच प्रशिक्षणे व्हावीत. त्यांना नवे प्रवाह वाचन हे माहीत करून देणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी यशदासारखे अद्ययावत प्रशिक्षण केंद्र गरजेचे आहे. पण आज अधिकारी भेटीच कमी झाल्यात. प्रशासन फक्त मीटिंग आकडेवारीत अडकून पडले आहे. कागदी काम खूप वाढले आहे. तेव्हा ही माहिती कमी कशी करायची, यासाठी तातडीने अभ्यासगट नेमणे गरजेचे आहे. संपूर्ण प्रशासन या महिन्यांच्या तणावात वावरते. अधिकारी फक्त माहितीच मागतात, त्यामुळे शिक्षकांचाही प्राधान्यक्रम माहिती होऊन क्षमतावृद्धीचे उत्तरदायित्व हरवले आहे. तेव्हा अधिकारी संवर्गाचे मूल्यमापन त्याच्या अधिनस्थ शाळांचा दर्जा बघून करणे अशी शासनाने भूमिका घेतली तरच अधिकारी गुणवत्तेबाबत आक्रमक होतील. पण ते आक्रमक होताना पुन्हा एक राजकीय पाठबळाचीही आवश्यकता आहे. अनेकदा कडक अधिकारी संघटनांच्या दबावाने राजकीय बळी ठरतो. आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात निवडणुकांतील चुरस प्रचंड वाढली आहे. एका तालुक्यात शिक्षकांची कुटुंबासह ७ ते १० हजार मते असतात आणि हा बोलका आणि संघटित वर्ग असल्याने त्यांना कोणीच दुखावत नाही. शिक्षक अधिवेशनाच्या काळात शाळा बंद राहूनही राजकीय कार्यकर्त्यांकडून फारशी ओरड झाली नाही ही यामागचीही कारणे आहेत. त्यामुळे या मुद्यावर एक राजकीय सहमती आवश्यक आहे. शिक्षक संघटनांची अधिवेशन सुटीतच घ्या. कारवायांबाबत हस्तक्षेप होणार नाही. शिक्षकांचे प्रश्न सोडवू, पण गुणवत्तेत तडजोड नाही ही ठाम भूमिका सर्वच पक्षांनी घेतली पाहिजे.
शिक्षणाच्या आशयाच्या सुधारणांसाठी महाराष्ट्रातील प्रयोगशील शाळांनी विकसित केलेला अध्यापन मूल्यमापन उपक्रम यांचा अभ्यास करून सार्वत्रिकीकरण केले पाहिजे. आजची प्रशिक्षणे प्रभावशून्य आहेत. प्रशिक्षणांची संख्या कमी करून प्रशिक्षणांची जबाबदारीच प्रयोगशील शाळांवर द्यावी. या शाळा सरकारी शाळांसाठी प्रेरणा होऊ शकतात. शासनाने केवळ या दोघांमध्ये सेतू होण्याची गरज आहे. ग्रामीण जनतेचा शिक्षणात सहभाग वाढविण्यासाठी निर्मलग्राम पुरस्कार, गाडगेबाबा पुरस्कार यांच्या मूल्यांकनात शाळेची गुणवत्ता हा महत्त्वाचा भाग असावा. विशेष अनुदान देतानाही प्राधान्यक्रम अशा चांगल्या शाळांच्या गावांना दिला तर गावकरीही गुणवत्तेबाबत आक्रमक होतील. ६८ आदिवासी तालुक्यांत ७००० ग्रामपंचायती आहेत. ज्या शाळेतील सर्व मुले ४ थीच्या क्षमता प्राप्त करतील व गळती शून्य असेल, त्या गावाला व शाळेला विशेष अनुदान जाहीर केले तर जादूची कांडी फिरेल.शिक्षण सुधारणे सोपे आहे, फक्त गुणवत्ता हा शासन राजकीय पक्ष आणि गावकरी यांचा प्राधान्यक्रम होणे गरजेचे आहे.
अप्रगत विद्यार्थ्यांची वाढती संख्या
वसंत पुरके शिक्षणमंत्री असताना महाराष्ट्राच्या शिक्षणात गुणवत्ता नाही, हे त्यांनी सतत मांडले. याची त्यांना किंमत चुकवावी लागली. त्यांनी केलेल्या पाहणीत २००५ साली ८ लाख विद्यार्थी अप्रगत निघाले. २००७ च्या पायाभूत चाचणीत ३१ लाख मुले अप्रगत होती. मी स्वत: याच काळात २०० शाळांमध्ये चाचणी घेतली तेव्हा ५११ वजा ४९९ ही वजाबाकी संपूर्ण बरोबर सोडविणारी चौथीची मुले अल्पसंख्येने आढळली. तो अहवाल मी 'शाळा आहे शिक्षण नाही' या नावाने प्रसिद्ध केला. त्या पुस्तकाची काही ठिकाणी होळी करण्यात आली. तेव्हा गेल्या ५ वर्षांत एकच निष्कर्ष सरकार किंवा स्वयंसेवी संस्थांकडून पुढे येतो आहे. हे सत्य स्वीकारले पाहिजे.

धडपडय़ा मुलां

सानेगुरुजींचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक मधुसूदन विष्णू तथा मामा कौंडिण्य यांचे नुकतेच निधन झाले.  प्राचार्य म्हणून काम करताना त्यांनी 'मुक्तांगण' सारखे अनेक अभिनव उपक्रम राबवले व अनेकांचे आयुष्य घडवले..
माझ्या अगदी लहानपणापासून मी मधुसूदन विष्णू तथा मामा कौंडिण्य या नावाचे गारूड ऐकत होतो. स्वातंत्र्यानंतर लगेचच अहमदनगर जिल्ह्य़ात डॉ. भा. पा. हिवाळे यांनी पहिले अहमदनगर महाविद्यालय सुरू केले. या महाविद्यालयात अत्युत्तम दर्जाचे प्राध्यापक आणण्याची डॉ. हिवाळे यांची धडपड होती. त्यांना अर्थतज्ज्ञ आणि पुणे येथील गोखले अर्थशास्त्र संस्थेचे अध्वर्यू डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या या शिष्योत्तमाची माहिती समजली. त्यामुळे नगरचे जावई असलेल्या मामांना त्यांनी अहमदनगर महाविद्यालयात अर्थशास्त्र शिकविण्यासाठी १९५८ साली रुजू करून घेतले. मामांनी १९६१ साली संगमनेर महाविद्यालयाची पायाभरणी करण्याची जबाबदारी घेऊन नगरचा निरोप घेतला.  मामांशी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांचा एक व्यक्तिगत भावबंध होता. त्यामुळे मामांशी सर्वाचे जिव्हाळ्याचे नाते प्रत्येकाच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकून होते.
मामांची राहणी अतिशय साधी, परंतु नेटकी होती. वर्गात वेळेआधी पाच मिनिटे मामा हजर असायचे. जे शिकवायचे त्याची पूर्वतयारी असायची. त्यामुळे पुस्तक घेऊन मामा अध्यापनासाठी कधीच उभे राहिले नाहीत. अर्थशास्त्र शिकविताना म. गांधी विचारधारेचा सखोल संदर्भ सतत असायचा. त्यांचे विभागप्रमुख डॉ. एस. के. हळबे यांच्यासोबत नगर येथे समाजकार्य महाविद्यालय सुरू करण्याबाबत मामांचा सतत संवाद आणि आग्रह होता. पुढे मामा संगमनेरला गेले. डॉ. हळबे यांनी नगरला हिवाळे संस्थेमार्फत समाजकार्य महाविद्यालय सुरू केले. नगरच्या रहिवासात मामा विद्यार्थ्यांना घेऊन त्या वेळच्या अमेरिकन मराठी मिशनच्या अनाथालयात, शासकीय बालगृहात नियमितपणे जात. येथील वंचित मुला-मुलींसाठी अभ्यासिका, संस्कारवर्ग, स्वत:चा सर्व पगार मामा या उपक्रमासाठीच खर्च करीत. या फकिरीत त्यांना विलक्षण मौज वाटे. येथील बालकांना भावनिक आधार आणि बळ देणारे उपक्रम करण्याची मामांची धडपड सर्वाना आजीवन प्रेरक ठरली.
संगमनेर येथे मामांनी जिवापाड मेहनत घेऊन विकसित केलेले महाविद्यालय त्यांची शिक्षण क्षेत्रातील प्रयोगशीलता, दूरदृष्टी, विद्यार्थ्यांतून देशाचे कर्तव्यशील नागरिक घडविण्याची तळमळ, गांधीवादी जीवनमूल्य सार्वजनिक जीवनात टिकविण्याची अविरत धडपड यांची साक्षीदार आहे. मामांचा निकट संबंध महाराष्ट्र आणि देशातील पुरोगामी विचाराच्या सर्व कार्यकर्ते आणि चळवळींशी होता. कुसुमाग्रज प्रतिष्ठान (नाशिक), भास्करराव दुर्वे प्रतिष्ठान (संगमनेर), मुक्तांगण स्वायत्त विद्यापीठ, धनंजयराव गाडगीळ प्रतिष्ठान, अथश्री ग्रामीण विकास केंद्र (पुणे) आदी संस्थांचे मामा संस्थापक विश्वस्त आणि प्रवर्तक होते. शिक्षणप्रक्रियेतून सामाजिक परिवर्तन आणि विद्यार्थ्यांत सामाजिक जाणिवांची निर्मिती करण्यासाठी मामांनी आदिवासी, विडी कामगार, लहान शेतकरी, रामोशी-पारधी- धनगर आदी उपेक्षित भटक्या समूहांसाठी १५ सामाजिक प्रकल्प राबविले. या त्यांच्या कर्तृत्वाची मोहिनी माझ्या आणि स्नेहालयच्या सर्व कार्यकर्त्यांच्या हृदयावर अधिराज्य करीत होती.
सेवाकार्यात एकमत हवे
मामांचा महाविद्यालयाच्या आवारात विलक्षण दरारा होता. महाविद्यालयात प्राचार्य कक्षात भेटल्यावर मामांना भेटण्याचा उद्देश सांगितला. 'आम्ही मुले देहव्यापारातील बळी महिला आणि मुलांसाठी काही करू इच्छितो.' हे ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावरील भाव मृदू झाले. ते म्हणाले, ''तुम्ही एक तासाने घरी या. तोपर्यंत महाविद्यालयातील आमचे प्रयोग पाहा.'' महाविद्यालयातील 'कमवा आणि शिका', छपाई कारखाना, रोपवाटिका आणि वनराई, जिमखाना, ग्रंथालय आदी पाहताना दोन तास गेले. मग मामांच्या घरी गेलो. मामांनी पहिलाच बॉम्ब टाकला. ते म्हणाले, ''तुम्हाला एक तासात बोलाविले होते. आता दोन तास झाले. सामाजिक काम करीत असाल तर दिलेली वेळ पाळली नाही तर चालते हे तुम्हाला कोणी सांगितले आहे का? येथूनच सुधारणेला प्रारंभ करा.''
सर्वाना पोटभर जेवायला घातल्यावर मामा म्हणाले, ''आता पोटभर बोला.'' आम्ही करीत असलेल्या कामाबद्दल सांगितले. तेव्हा वेश्या वस्तीत आमचा सायंकालीन संस्कारवर्ग, रात्रसेवा केंद्र, कंडोमचा प्रसार, महिलांचे आरोग्य प्रकल्प आदी चालू झाले होते. या कामाने मामा विलक्षण प्रभावित झाले. प्रमुख अडचणी काय आहेत, असे त्यांनी विचारल्यावर आम्ही सांगितले, कार्यकर्ते, विशेषत: मुली आणि महिला लालबत्ती भागात सोबत काम करायला बिचकतात. त्यांना घरूनच विरोध होतो. या कामाला देणगीदार पुरेसे मिळत नाहीत. लोकांना वेश्या गुन्हेगार वाटतात. त्यामुळे त्यांच्याविषयी घृणा आणि तिरस्काराचा भाव आहे. मामांनी कामाचे आणि विषयाचे सर्व पैलू पाच तास देऊन समजावून घेतले. काम पाहायला येईन म्हणाले. काही मौलिक सल्ले त्यांनी आम्हाला दिले.
मामा म्हणाले, ''वेश्यांचे आणि त्यांच्या संततीचे प्रश्न आणि त्यांच्याकडे बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन हजारो वर्षे जुना आणि अन्यायकारक आहे. यासाठी चिकाटी ठेवून, आयुष्यभर नाउमेद न होता काम करण्याची तयारी ठेवा. यात एका बाजूला पुनर्वसनाची कामे, तर दुसऱ्या बाजूला सामाजिक प्रबोधन आणि चळवळ करावी लागेल. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घ्यावे लागेल; परंतु ज्यांच्यासाठी काम करता त्या महिला आणि मुलांचा तुमच्या कार्यातील सहभाग मध्यवर्ती, महत्त्वाचा बनवावा लागेल. कधी तरी त्यांच्या प्रश्नांचे ओझे त्यांनाच उचलण्यासाठी सक्षम करणे, हा कामाचा दूरगामी उद्देश हवा.'' त्यानंतर मामांनी नाबालाची तोपर्यंत आम्हाला माहिती नसलेली कथा सांगितली. वेश्येची संतती औरसच असते. त्या संततीचे बाप अनौरस असतात. परिस्थितीने, विवशतेमुळे, समाजात स्वीकृती नसल्याने किंवा जबरदस्तीने लालबत्तीत आलेल्या महिला गुन्हेगार नाहीत. त्यांना येथे आणणारे आणि त्यांच्याविषयी जाणून न घेता त्यांची घृणा करणारे गुन्हेगार आहेत, असे स्नेहालयने समाजाला ठणकावून सांगितले पाहिजे. त्यात मोघमपणा नको, हे मामांनी सांगितले. हे ऐकून आपण करतो ते चूक की बरोबर हा संभ्रम मिटला. स्नेहालयची एक वैचारिक भूमिका घडायला सुरुवात झाली. निघताना मामांनी सांगितले की, तुम्ही सर्व तरुण आहात म्हणून सांगतो. तुम्हाला एकत्र राहून काम करायचे असेल तर आपसात एकमत करूनच पुढे जा. बहुमताच्या बळावर संस्था प्रगती करणार नाही. मतभेद होऊ द्या. चर्चा होऊ द्या. शेवटी एकमत करा आणि मगच पुढे जा. एकमत झाले नाही तर ज्यावर एकमत आहे, त्याच गोष्टी करा. तुमची संघटना टिकली तरच काम उभे राहील. पैसे आल्यावर काम होत नसते, तर काम असले तरच पैसे आणि काम करणारे सेवाव्रती येतात, हे लक्षात असू द्या. तुम्ही कामाच्या मागे लागा. पैसा आणि साधने मागे येत राहतील. संस्थेत विश्वस्त म्हणून कोणीही आजन्म काम करायचे नसते. दर १० वर्षांनी पूर्ण नवी टीम हवी. जुन्या लोकांनी कार्यकर्ते म्हणून सक्रिय राहायचे, म्हणजे संस्थेचे थडगे होत नाही. स्नेहालयचे विश्वस्त होण्याचा आमचा आग्रह नाकारून मामा म्हणाले, ''या कामासाठी तुम्ही पेटलेले तरुण शोधा. मी सोबत आहेच.'' जाताना मामांनी रोख १५ हजार रुपये आणि वाचनालयासाठी २०० पुस्तके हातात ठेवली. कार्यकर्त्यांना नगपर्यंतचे एस.टी.चे भाडे म्हणून ५०० रुपये वेगळे दिले. आम्ही भारावलेल्या अवस्थेत आणि प्रचंड आत्मविश्वास घेऊन कामास जुंपलो. एका महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयात मामा आले. तेव्हा ते काम संपल्यावर थेट आमच्या जुन्या मंगळवार बाजारातील घरी आले. मला म्हणाले, ''दाखव तुझे काम.'' माझ्या आई-वडिलांना त्यांनी सांगितले की, स्नेहालयच्या कामामागे उभे राहून तुमचे जीवन अर्थपूर्ण आणि कृतार्थ झाले आहे. फारच थोडी मुले आपल्या आई-वडिलांना अशी भेट देतात. प्रथमच कोणी तरी मोठा माणूस आमचे काम पाहायला येत होता. आमची लगबग सुरू झाली. मामांनी चित्रा, भगत, नांगरे आणि ममता गल्लीतील वेश्यांशी हृद्य संवाद केला. स्नेहालयवर विश्वास ठेवलात तर तुमचे आणि पुढच्या पिढीचे भविष्य उज्ज्वल बनू शकते, हा मामांचा संदेश सर्वाच्या हृदयात झिरपला. मामांनी या महिलांकडून त्यांचे वेदनामय जीवन समजावून घेतले. त्यानंतर पुढील अखंड १९ वर्षे मामांनी स्नेहालयच्या कार्याचा आणि भावधारेचा समाजात प्रचार आणि प्रसार केला. नगर जिल्ह्य़ातील प्रत्येक वेश्यावस्तीत जाऊन त्यांच्या घरात आणि तेथील संस्थेच्या प्रकल्पात थांबून मामांनी बदलावर महिलांचा विश्वास बसविला.
दातृत्वाचा दीपस्तंभ
गांधी विचारधारेचा मामांवर प्रभाव होता. विशेषत: सत्य-अहिंसा, अपरिग्रह, विश्वस्त संकल्पना, साधेपणा, कृती आणि उक्तीतील एकत्व यांचा मामांच्या व्यक्तिमत्त्वात अनोखा मिलाफ होता. स्नेहालयला नगरच्या औद्योगिक वसाहतीत जागा मिळाली. तेव्हा आम्ही इमारत बांधून मग माझ्या घरातील स्नेहालय प्रकल्प स्थलांतरित करण्याची योजना आखली; परंतु मामांनी सांगितले की, आधी काम, मग इमारती होतात. जेवढे पैसे आहेत तेवढय़ात झोपडी बांधा, पण काम पहिले सुरू करा. आम्हाला त्यांनी पाबळ, ता. शिरूर, जि. पुणे येथील डॉ. कालबाग यांच्या विज्ञान आश्रमात पाठविले. तेथून सामान आणून आम्ही कार्यकर्त्यांनीच श्रमदानाने एक डोम बांधला. त्यात मामांच्या आग्रहास्तव लालबत्तीतून मुले-मुली आणून काम सुरू केले. काम सुरू केल्याने कार्यकर्ते आणि देणगीदार यांचा ओघ सुरू झाला. मामांनी दिशा दिल्याने आमच्या डोक्यावर उभ्या असलेल्या सामाजिक कामाच्या या कल्पना पायावर उभ्या राहिल्या. दान नादान करते. म्हणून देणगीला 'सहयोग' म्हणण्याचा मामांचा आग्रह होता. सहयोग देणारा घेणाऱ्याला अथवा त्याचा वापर करणाऱ्या कार्यकर्त्यांला उपकृत करीत नसतो, तर सहयोग देणाऱ्याचा विश्वस्त भाव व्यक्त करण्याची संधी त्याला संस्था किंवा कार्यकर्ते देत असतात, असे मामा मानत. त्यामुळे लक्षावधी रुपयांचा सहयोग सेवाकार्याला देणारे मामा आजन्म विनम्र आणि प्रांजल राहिले. १९९७ साली निवृत्त होताना मिळालेल्या पैशांतून मामांनी स्नेहालयला पाच लाख रुपयांचा सहयोग दिला. त्यातून मामांच्याच कल्पनेनुसार कृतज्ञता पुरस्कारांना सुरुवात झाली. या निधीत मामांनी दर वर्षी भर टाकली. आजवर २१८ सामाजिक कार्यकर्त्यांना आणि संस्थांना त्यांच्या सेवाकार्याबद्दल कौंडिण्य पुरस्कृत पुरस्कारांनी गौरविण्यात आले. आपला आर्थिक सहयोग त्यानिमित्ताने मामांनी विविध सेवाकार्याना दिला. आपले संगमनेरमधील घर-जागा विकून मामा पुण्याला राहायला गेले. जाताना जेवढे पैसे या व्यवहारातून मिळाले ते लोकपंचायत, स्नेहालय आदी संस्थांना मामांनी लगेचच वाटून टाकले. जे समाजाने दिले त्यातून गरजेपेक्षा जास्त जवळ ठेवणे हा समाजद्रोह असल्याचे मामा मानत. एवढेच नव्हे, तर मामांनी आपल्या संपर्काचा आणि विश्वासार्हतेचा वापर करून समाजातून विशेषत: नवोदित संस्थांना मोठे आर्थिक पाठबळ उभे करून दिले. पुणे येथील ज्येष्ठ समाजसेवक रमाकांत तांबोळी यांना नगर येथे स्नेहालयसोबत आपल्या अनुभवाचा लाभ देण्यासाठी पाठविले. फासेपारध्यांची ५० मुले सांभाळणाऱ्या श्रीगोंदे येथील अनंत झेंडेंपासून एड्सग्रस्त मुलांना खांडगाव (ता. संगमनेर) येथे घर देणाऱ्या संतोष पवापर्यंत अनेकांचा समावेश आहे. मामांनी १९७२ च्या दुष्काळात १२०० विद्यार्थ्यांची छावणी चालवून त्यांचे शैक्षणिक वर्ष वाचविले. त्यासाठी सरकारी पैसे मिळाले नाहीत, तेव्हा मामांनी स्वत:च्या नावे कर्ज काढले. कर्मवीर भाऊराव पाटलांचा त्यांच्यावरील प्रभाव अशा अनेक प्रसंगांतून व्यक्त झाला. मामा महाराष्ट्रातील असंख्य धडपडय़ा मुलांचे खऱ्या अर्थाने बाप होते. जुने विद्यार्थी भेटल्यावर 'तुझी प्रगती उत्तम झाली, पण समाजासाठी तू काय केलेस किंवा करतोस, ते सांग,' असे मामा विचारीत.
स्नेहालयच्या कामासाठी मामांनी संस्थेला नवी कोरी  गाडी घेऊन दिली. अडचणींच्या काळात मी ही गाडी विकेन म्हणून स्नेहालयचे अध्यक्ष सुवालाल शिंगवी यांच्या नावावरही गाडी त्यांनी केली. डिझेलच्या खर्चाची तरतूद करून दिली. सहा महिन्यांपूर्वी आम्हा चार कार्यकर्त्यांचा शिक्रापूर येथे अपघात झाला. त्यात मामांनी दिलेल्या  गाडीचा चुरा झाला. ही गोष्ट मामांपासून आम्ही लपवून ठेवली. मामांचा पाच दिवसांनी फोन आला. ते म्हणाले, ''अपघातातून सुखरूप राहिल्याबद्दल अभिनंदन. चांगल्या गाडीमुळे चार कार्यकर्त्यांचा जीव वाचला. हे बरे झाले. गाडीचे दु:ख करू नका. तुम्हाला आता एक इनोव्हा गाडी घेऊन देतो.''
अण्णांच्या आंदोलनाबद्दल मामांना अतिशय ममत्व होते. स्व. नवलमल फिरोदिया आणि बाळासाहेब भारदे यांच्यानंतर अण्णांसाठी मामा हाच एक पितृतुल्य आधार होता. तरुण पिढीविषयी समाजाला आशावादी करण्यात मामांनी कोणतीही कसर सोडली नाही. ज्या संस्थांचे ते विश्वस्त होते, तेथे आपल्या परखड विचारांनी ते योग्य दिशा देत. गेली दोन वर्षे त्यांचे गुरू धनंजयराव गाडगीळ यांच्या नावाने ग्रामीण विकास प्रकल्प सुरू करण्याचा आग्रह ते मला करीत होते.  ताम्हिणी घाटातील आदिवासी मुलांसाठी शेवटची सात वर्षे अथश्री प्रतिष्ठानतर्फे मामांनी शैक्षणिक प्रकल्प राबविला. ते अखेपर्यंत समाजातील वंचितांसाठी कार्यरत होते. शेवटी डॉक्टरांना त्यांनी सांगितले की, माझे उपचार थांबवा. निर्थक जगणे मरणाहून भयंकर आहे. या पैशातून काही गरीब मुलांचे शिक्षण होईल. ठरविले असते तर त्यांनी अजूनही काही महिने अंथरुणावर काढले असते, परंतु निग्रहाने अन्नत्याग करून सावरकर- विनोबांच्या मार्गाने मामा मार्गस्थ झाले.
राजूर (वार्ताहर )आदिवासी व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे उघडी करून देतांना निसर्ग रम्य साहियाद्रीचा कुशीत वसलेले मवेशी गावातील विद्यालय पाहून रवींद्रनाथ टागोर यांचा गुरुकुल शिक्षण पद्धतीची आठवण होते आशे प्रतिपादन डॉक्टर गजानन दादा शास्त्री महाराज (बुलढाणा) यांनी मवेशी तालुका अकोले येथे बोलतांना केलें.
                        श्री समर्थ माध्यमिक विद्यालय मवेशी येथे नवीन इमारत पाया भरणी शुभारंभ परम्पुज्ज सुभाष पुरी महाराज कळस व प्राध्यापक गजानन दादा शास्त्री महाराज (बुलढाणा) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला .
6 attachments — Download all attachments   View all images   Share all images  
100_9113.JPG100_9113.JPG
2573K   View   Share   Download  
100_9184.JPG100_9184.JPG
3713K   View   Share   Download  
100_9211.JPG100_9211.JPG
3138K   View   Share   Download  
100_9127.JPG100_9127.JPG
4033K   View   Share   Download  
100_9161.JPG100_9161.JPG
3712K   View   Share   Download  
DSC09761.JPGDSC09761.JPG
12