राजूर (वार्ताहर
)कळसुबाई शिखराच्या पायथ्यासी असलेल्या उद्दावने गावातील निसर्गाची भाषा
अवगत असलेला ठका बाबा गांगड आदिवासी अवलिया कलाकार आत्ता वृध्प्काळात
जगण्याची धडपड व संघर्ष करीत असल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले होते .
शनिवारी राजूर न्यायलया संधर्भात औरंगाबाद खंड पीठाचे न्यायमूर्ती ए. एच .
जोशी साहेब येथे आले होते . त्यांच्या समवेत जिल्हा न्यायमूर्ती जयवंत
कुलकर्णी साहेब , अकोले न्याय्ल्याचे न्यायधीश क्षीरसागर , न्या . मुलाणी ,
होते . त्यावेळी जाणीवपूर्वक न्यायमूर्ती जोशी साहेबांनी ठकाबाबा यांना
बोलून त्यांची विचारपूस केली . पशु , पक्षी ,यांचा आवाज कसे शिकले याची
अस्थेनी चौकशी केली . यावेळी ठ्काबबानी आपल्या आविष्कारचे दर्शन घडवले ते
पाहून न्यायमूर्ती आवाक झाले . अशा कलाकार या भागात असून हा या भागाचा
गौरव असल्याचे न्यायमूर्ती म्हणाले .तर शाल ,पुष्प गुछ्य देऊन ठ्काबाबा चा
गौरव केला . तर सांस्कृतिक विभागणी या कलाकाराचा विचार करणे गरजेचे आहे .
तर आदिवासी भागातील हि कला तिचे संवर्धन होणे आवश्यक असल्याचे न्यायमूर्ती
कुलकर्णी म्हणाले . न्यायमूर्तीनी आपल्या कलेची दखल घेतल्याबद्दल ठका
बाबांनी समाधान व्यक्त केले .
77002_106686859401114_6852417_n.jpg 44K View Share Download |
DSCN4407.jpg 261K View Share Download |
DSCN4408.jpg 226 |
No comments:
Post a Comment