Monday, 1 April 2013

हीु्िरल्लॅ२>ल्ल/हीु्िरल्लॅ२> महाराष्ट्र पॉझिटिव्ह हीु्िरल्लॅ२>ल्ल/हीु्िरल्लॅ२> तुमच्या आजूबाजूला घडत असेल असं काही शुभंकर, तर तपशील कळवा आणि उचला एक पुढचं पाऊल. हीु्िरल्लॅ२>ल्ल/हीु्िरल्लॅ२> प्रतिक्रिया, अधिक माहितीसाठी इमेल - mh.positive@lokmat.com रूपाली मुधोळकर। दि. ३१
गल्लोगल्ली पानटपर्‍यांवर तंबाखू, गुटख्याचे तोबरे चघळणारे तरुण...त्यांच्या तोंडातून बाहेर पडणार्‍या थुंकीच्या पिचकार्‍या... सिगारेटाच्या धुराची वतरुळे. असल्या गोष्टींकडे एक तुच्छ कटाक्ष टाकून आपण पुढे सरकतो आणि नाकासमोर चालत सुटतो. शहरातल्या पॉश वस्त्या असोत, नाहीतर एखाद्या गावखेड्याची वेस.. मिसरूडही न फुटलेली पोरं टवाळक्या करत तोंडात गुटख्याच्या पुड्या रिचवताना दिसतात. सरकारने बंदी लादूनही चहाच्या टपर्‍या, पानठेल्यांवर गुटख्याच्या पुड्या खुलेआम विकल्या जातात. संताप येतो... पण आपल्यापैकी बहुतेक जण याकडे दुर्लक्ष करतात...
- पण डॉ. संध्या पवार ही प्राथमिक शाळेतली शिक्षिका या संतापाच्यापुढे जाते. तंबाखू, गुटखा, दारू अशा व्यसनांच्या आहारी गेलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी स्वखर्चाने गावागावांत फिरते. शाळाशाळांत जाऊन व्याख्याने देते. हा प्रश्न या शिक्षिकेला सुन्न करतो, विचार करायला भाग पाडतो आणि केलेला विचार अमलात आणण्यासाठी धावधाव धावायलाही लावतो....
नागपूरपासून सहा किमी अंतरावरील किरणापूरच्या प्राथमिक शाळेत सहायक शिक्षिका असलेल्या संध्या पवार डॉक्टरेट आहेत. पदोन्नती घेतली तर मानपान मिळेल, पगार वाढेल, पण समाजासाठी देता येणारा वेळ अपुरा ठरेल, म्हणून त्यांनी स्वत:हून पदोन्नती नाकारली आणि करता येईल तेवढं करत सुटल्या आहेत.
'मी काही फार मोठी नव्हे, मला करता येईल तेवढं करते. कुणी माझ्यासोबत यावं-जावं, मला काहीही फरक पडत नाही. पदरात पडतंय, ते फार मोठं नाही. पण या मूठभर कामाचं वितभर समाधान हे माझ्यासाठी सर्व काही आहे,' असं संध्या पवार प्रांजळपणे सांगतात.
तरणीताठ पोरं व्यसनाच्या आहारी जाताना पाहून या पोरांसाठी काहीतरी करायचं या विचाराने पछाडलेल्या संध्याताई पदरमोड करून गावोगाव फिरतात. आत्तापर्यंत ३00 शाळा त्यांनी पिंजून काढल्या. एका व्याख्यानाने व्यसनाच्या आहारी गेलेल्या पोरांमध्ये फरक पडणार नाही, हे त्यांनाही ठाऊक आहे. यावर त्यांनी एक नामी युक्ती शोधून काढली.
तुमचा कुठलाही प्रश्न असो, मला मिसकॉल द्या, असं आवाहन करून त्या मुलांना स्वत:चा मोबाइल नंबर देतात. असे कित्येक मिसकॉल त्यांना मुलांच्या आयुष्याशी थेटच जोडतात. व्याख्यानं, समुपदेशन याने खूप मोठा बदल घडणार नाही, हे संध्याताई जाणून आहेत, पण 'माझ्या प्रयत्नाने शंभरातला एक जरी पोरगा चांगल्या रस्त्याला लागला तर ते माझे यश आहे,'- हा त्यांचा पराकोटीचा आत्मविश्‍वास नतमस्तक करणारा आहे. किरणापूर या लहानशा गावात त्यांच्या या आत्मविश्‍वासातून झालेल्या बदलाच्या खुणा पदोपदी दिसतात.
शिक्षण घेऊ इच्छिणारा कुठलाही गरजू विद्यार्थी असो, त्याच्यासाठी आपल्या घराची कवाडं त्यांनी खुली करून दिली आहेत. दोघांपैकी एकाचा पगार केवळ या कामासाठी राखून ठेवायचा., असं संध्याताई आणि त्यांचे पती यांनी सामंजस्याने ठरवलं. आजही यात खंड पडलेला नाही. पायात त्राण आणि हातात बळ असेपर्यंत दिसेल ते, जमेल तेवढं करीत राहायचं, हेच संध्या पवार यांचं साधंसुधं जीवनसूत्र. 'जमेल तेवढं करीत राहावं,' त्या म्हणतात, आणि निर्मळ हसतात.

No comments:

Post a Comment