आयुष्यभर
मला अबोलपणे साथ देत आली आहेस तू... तुझ्यासारख्या गृहलक्ष्मीमुळे आपल्या
घराला घरपण आलं. म्हणूनच तू घरी नसलीस, की घरातलं सर्व काही तेच असतानाही
पोरकं वाटायला लागतं.
आपलं लग्न झाल्यापासून कित्येक वर्षे मी तुला कुठे जाऊच दिलं नाही. मर्यादेपेक्षा शांत असलेल्या तुझ्या स्वभावामुळे तू कधी कुरकुरली नाहीस. आपल्या पहिल्या मुलीच्या वेळी बाळंतपणासाठी तू माहेरी गेलीस आणि मी एक वर्षाच्या अभ्यास रजेवर कोल्हापूरला गेलो. दोघांचाही नाईलाज होता, तरीही मी अधूनमधून तुझ्या भेटीसाठी उस्मानाबादला येत असे. तुला आठवतं का गं? असंच एकदा मी कोल्हापूरहून येत असल्याचं तुला आधी पत्रानं कळवलं होतं. पहाटे तुझ्या माहेरी पोहोचलो, तर तू तिथं नव्हतीस. आपल्या चिमुकल्या पल्लवीला घेऊन तू माझ्या बहिणीकडे गेल्याचं समजताच मी नगरला पोहोचलो होतो. पाहातो, तर तू तिथंही नव्हतीस. माझी बहीण म्हणाली, अरे अप्पा शोभा सकाळीच तिच्या बहिणीकडे गेली आहे. चार घास पोटात ढकलून मी तिथून निघून थेट बेगमपुरला पोहोचलो होतो. तिथे तू भेटलीस तेव्हा किती आनंद झाला होता आपल्या दोघांनाही.
त्याकाळी आजच्यासारखी संपर्काची साधनं नसल्यामुळेच हा आनंद उपभोगता आला. पल्लवी पाठोपाठ अस्मिता व प्रियांका आपल्या संसारात आल्या आणि आपल्या गोकुळातच आपण हरखून, हरवून गेलो. स्वत:कडे आणि एकमेकांकडे बघायला सवडच मिळाली नाही. मुली शाळेतून घरी आल्या की पहिला प्रश्न विचारीत, 'आई कुठे आहे?' माझ्याच मुली त्या. तुझ्याविना त्यांनाही घर पोरकं वाटे. चार भिंती आणि त्यावरचं छत म्हणजे घर नसतं. तुझ्यासारख्या गृहलक्ष्मीमुळे त्याला घरपण येतं. म्हणूनच तू घरी नसलीस, की घरातलं सर्व काही तेच असतानाही पोरकं वाटायला लागतं. मी फक्त नोकरी करायचो. त्यामुळे घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या तू स्वत:हून स्वीकारल्यास. मुलींना मोठं केलंस. संस्कार दिलेस. आपल्या मुलीही कर्तबगार निघाल्या. स्वत:च्या पायांवर उभ्या राहिल्या आणि त्यांच्या संसाराला लागल्या. परत आपण पहिल्यासारखे दोघंच राहिलो.
उभ्या आयुष्यात तू मला पगार किती मिळतो म्हणून विचारलं नाहीस आणि आज निवृत्तीवेतन किती मिळतं हेही विचारत नाहीस. मीही स्वत:हून तुला कधी सांगितलं नाही; कारण तू चिडावीस, रागवावीस, असं नेहमी वाटायचं. त्यातही एक गंमत असते, गं! हल्ली तू अधूनमधून कधी आपल्या मुलींकडे, तर कधी तुझ्या आईकडे जात असतेस. जाताना माझ्यासाठी तू तहानलाडू, भूकलाडू करून ठेवतेस. ते कुठे ठेवलेत हे पुन्हा पुन्हा बजाऊन सांगतेस, तरीही मला ते सापडतीलच याची खात्री नसते. कधीतरी जेवणाचा डबा येतो आणि मी कधीतरी जेवतो. तरीही मी नियमित चहा करून पितो, न्याहारी करतो, भोजन करतो, असं फोनवरून तुला खोटंच सांगत असतो. तुझ्या हातचे पदार्थ तुझ्यासमोर बसून खाण्याची सर कशालाच नाही. पल्लवीकडचा मुक्काम संपवून तू परत आलीस, की पोटभर जेवेन म्हणतो. तोपर्यंत संक्रांतीसाठी तू करून ठेवलेल्या तिळगुळाच्या वड्या कुठे सापडतात का ते पाहातो. आयुष्यभर अबोलपणे साथ देणारी तूच माझ्या लिखाणामागची प्रेरणा आहेस.

No comments:
Post a Comment